*पिंटुस गोळीबार हत्याकांडातील मागील तीन महिन्या पासून फरार आरोपीस मध्यरात्री दरम्यान मोर्शी येथे अटक* पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे याच्या टीम ची कार्यवाही

0
910
Google search engine
Google search engine

*पिंटुस गोळीबार हत्याकांडातील मागील तीन महिन्या पासून फरार आरोपीस मध्यरात्री दरम्यान मोर्शी येथे अटक*
पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे याच्या टीम ची कार्यवाही

चांदुर बाजार :-

पो स्टे स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 4 मार्च ला सायंकाळी च्या दरम्यान नगर परिषद शाळेच्या समोर असलेल्या चहाच्या कँटीन वर गोळीबार झाला होता.यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला होता.या मध्ये पोलिसांनी आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल सत्तार वय 62 वर्ष रा ताज नगर ,चांदूर बाजार याला मोर्शी या ठिकाणी वरून अटक केली.

चांदूर बाजार येथील क्रुप्रसिद्ध गोळीबारीकांडातील दाखल अपराध क्रमांक 126/20 कलम 302, 201, 120ब, 34 भादवी R/w 3, 25 आर्म ऑक्ट मधील मागील तीन महिन्या पासून फरार होता. चांदूर बाजार पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे आणि त्यांच्या टीम ला मिळालेल्या गोपनीय महितीचे आधारावरन त्यांनी मोर्शी येथून मोठ्या शिताफिने आरोपीला अटक करण्यात आली आहे.

सदर कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन ,उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपुर यांचे आदेशाने मा पोलीस निरीक्षक उदयसिग सोळंके सा यांचे मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक गजानन राहाटे साहेब सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक खंडारे ,पोलीस निरीक्षक रायटर पोलीस कॉस्टबल विनोद इंगले ,नाईक पोलीस कॉस्टबल निकेश नशिबकर ,पोलीस कॉस्टबल अमोल टेकाडे ,लेडीज पोलीस कॉस्टबल प्रणाली बावनेर यांनी केली आहे.

फोटो :- अटक आरोपी सोबत पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे यांची टीम