*शेतकऱ्यांची पिळवणूक खपून घेतल्या जाणार नाही- आ.प्रताप अडसड*

*शेतकऱ्यांची पिळवणूक खपून घेतल्या जाणार नाही- आ.प्रताप अडसड*

*धामणगाव रेल्वे तालुक्यात सापडलेल्या बोगस बियाण्या संदर्भात आ.प्रताप अडसड यांनी जिल्हा कृषि अधिक्षक यांच्या उपस्थित घेतली आढावा बैठक*

*शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना ठिबक सिंचन, स्प्रिंकलर योजनेचे पैसे लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश आ. प्रताप अडसड यांनी दिले.*

*सदर प्रकरणात गुन्हेगारांवर सक्तीची कार्यवाही करण्याचे दिले निर्देश*

*जिल्हा कृषी अधीक्षक   व धामणगाव रेल्वे मतदारसंघातील तालुक्यांचे तीनही तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत आमदार प्रतापदादा अडसड यांनी बैठक घेतली. बैठकीमध्ये बोगस बियाण्याच्या बाबतीमध्ये तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना ठिबक सिंचन व स्प्रिंकलर चे पैसे लवकरात लवकर वितरीत करण्याबाबत निर्देशीत केले. त्याचप्रमाणे कुशल चे पैसे आणण्याकरिता पाठपुरावा करावा व काही मदत लागल्यास मलाही सांगावे असे यावेळी आ.प्रताप अडसड म्हणाले.*

*तसेच कृषी विभागा मार्फत ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आहेत किंवा शेतकऱ्यांच्या हिताकरिता योग्य पद्धतीने शेती करण्या संदर्भातल्या ज्या काही माहिती सूचना असतील त्या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचण्याची व्यवस्था येणाऱ्या काळात करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचना दिल्या*
*वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक परिस्थितीने खचलेल्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याच्या दृष्टीने अनेक लोक कार्यरत असतात. त्यांना आमीष दाखवून वेगवेगळ्या योजना व प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक करत असतात. ती फसवणूक होऊ नये याकरता जागृती करणे व अशा फसवणूक करणाऱ्यांना योग्य शासन होण्याकरिता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व कराव्या अशा सूचना देखील दिल्या.*

जाहिरात