दर्यापूरात लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय सिल शासनाच्या नियमाचे उल्लंघन ; गुन्हाही दाखल

0
1627
Google search engine
Google search engine

दर्यापूरात लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय सिल
शासनाच्या नियमाचे उल्लंघन ; गुन्हाही दाखल

अमरावती :- प्रतिनिधी

सर्वत्र कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सूर आहे. जिल्हाधिकारींच्या आदेशानुसार मंगल कार्यालय सुरू ठेवण्यास प्रतिबंध आहे. तरीसुद्धा अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील नगर परिषद हद्दीतील पोस्ट आँफिस समोरील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय या ठिकाणी लग्नसोहळा सुरू असल्याची माहिती प्रशासणाला मिळताच प्रशासनाच्या वतीने मंगल कार्याला सिल लावून गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय नियम डावलून मंगल कार्यालयात लग्न सोहळा सुरु ठेवण्यात आलेली जिल्ह्यातील प्रथम कार्यवाही आहे. या कारवाईच्या दरम्यान तहसीलदार डाँ.योगेश देशमुख,मुख्याधिकारी गीता वंजारी व त्यांचे सहकारी कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले.त्या ठिकाणची पाहणी केली असता आयोजकांना लग्नसोहळा पार पाडण्याकरिता २० लोकांची परवानगी मिळाली होती.मात्र आयोजकांनी हा लग्न सोहळा लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय या ठिकाणी करताना वीस पेक्षा जास्त लोकांची गर्दी आढळून आल्यामुळे तसेच कोणत्याही अटी व शर्ती पाळण्यात आलेल्या नसल्यामुळे तसेच मंगल कार्यालयात प्रतिबंध असताना मंगल कार्यालय भाड्याने दिल्याने मंगल कार्यालय सील करून मालकावर कारवाई करण्यात आली आहे.तसेच वधु पक्षातील आई व मंगल कार्यालय मालक रामलाल अग्रवाल यांच्येवर स्थानीक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.