प्रसार माध्यमात काम करणार्या सर्व घटकासाठी सरकारने स्वतंत्र पॕकेज जाहीर करावे- प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

0
403
Google search engine
Google search engine

प्रसार माध्यमात काम करणार्या सर्व घटकासाठी सरकारने स्वतंत्र पॕकेज जाहीर करावे- प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे
केंद्राच्या वीस लाख कोटी पॕकेज मध्ये माध्यमाचा उल्लेख नाहीच
उस्मानाबाद प्रतिनिधी
कोरोना काळात सर्वात जास्त फटका वृत्तपञ, लघुवृत्तपञ, पञकार तसेच यात कार्य करणारे सर्वच घटक यांना बसला आहे.अनेक वृत्तपत्र ,लघुवृत्तपञ यांना प्रकाशने बंद करावी लागली व सुरु होण्याची शक्यता मावळली आहे.या सर्व बाबीचा आहवाल तयार करुन राज्य सरकारकडे सादर करणार आहोत.शिवाय केंद्राने 20 लाख कोटीचे पॕकेज जाहीर केले माञ माध्यमांचा त्यात उल्लेख नाही. लॉक डाऊनच्या कार्यकाळात वृत्तपत्र क्षेत्राची प्रचंड हानी झाली आहे.त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र आर्थिक पॅकेज जाहीर करणे अत्यावश्यक झाले आहे.यासंदर्भात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ केंद्र आणि राज्यस्तरावर न्याय मागणीसाठी संघर्ष करेल अशी स्पष्ट भूमिका पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील पत्रकारांची वेब बैठकीद्वारे स्पष्ट केली.
सध्याची संसर्गजन्य कोरोना रोगाची परिस्थिती लाॕकडाऊन मध्ये
उद्धभवत असलेले विविध प्रश्न ,पञकार ,प्रसार माध्यमे यांची अवस्था या सर्वच बाबीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे वेब बैठका घेत आहेत.आज त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य पञकार संघाचे पदाधिकारी तसेच स्थानिक पञकार सदस्या बरोबर वेब संवाद साधला. या वेळी बैठकीसाठी राज्य संघाचे मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव, बीड जिल्हा अध्यक्ष तथा मराठवाडा संघटक वैभव स्वामी,नाशिक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण डोळस यांनी वेब संवाद आयोजित केला होता.
प्रारंभी मंञालय प्रमुख नितीन जाधव यांनी प्रस्ताविक केले व संघाची कोरोना काळातील कार्याची माहीती देत वेब बैठकांमुळे पञकारांना उपयोग होत असल्याचे मत स्पष्ट केले.तर बीड जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी यांनी उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांना आपले कोरोना काळातील कार्य ,पञकारांच्या अङचणी सूचना प्रदेशाध्यक्षांसमोर सादर करण्यास सांगितले.तेव्हा जिल्हा अध्यक्ष सुनिल बनसोडे यांनी कोरोना काळात जिल्हात सामाजिक कार्य फारसे केले नसल्याचे सांगितले पण ग्रामीण पञकारांना मिळणारे मानधन, त्यांची नोकरी अङचणीत आल्याचा उल्लेख केला तसेच संघटनेचे बळकटीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मुद्दा मांडला.या चर्चेत पुढे संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे म्हणाले की, पञकारांची गणना,स्वतंत्र व्याख्या ,जिल्हा कचेरीत नोंद हे विषय हाती घ्यावे लागतील.तसेच पञकारितेत अनावश्यक , स्वयंघोषित लोक शिरकाव करत असल्याचे स्पष्ट केले.या चर्चेत जिल्ह्यातील सहभागी पञकारांनी स्वतंत्र चर्चा करत मुद्दे मांडले .या वेळी अरुण लोखंडे,गणेश खबोले,प्रकाश गायकवाड,सचिन तोगी,संतोष शिंदे.शिवशंकर तिरगुळे,सचिन गायकवाड ,प्रकाश गायकवाड, सुजित शिंदे यांनी वेब संवाद साधत दिलखुलास चर्चा केली.मराठवाडा संघटक वैभव स्वामी यांनी सर्व पञकारांचे आभार मानले.