अकोट तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरु झाली लालपरीची सेवा

0
1492

अकोट:संतोष विणके

प्रवाश्यांचा मागणीनुसार मिळणार विस्तारीत सेवा

राज्यशासनाने लॉकडाऊन शिथिल केल्याने रा.प महामंडळकडून नागरिकांच्या सोयीसाठी रेड व कॅन्टोनमेंट झोन वगळता जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली आहे या सेवेनंतर एसटी ने आकोट तालुक्याच्या ग्रामिण भागातील जनतेच्या सोईसाठी तालुका ते गाव अंतर्गत ग्रामिण भागातही सेवा सोमवारपासुन सुरु केली आहे.

खेडेगावातील नागरिकांना तालुका ते खेडेगाव अशी बससेवा नसल्याने खेडेगाव ते तालुका अशी बससेवा सुरू करणेबाबत नागरिकांची मागणी होत होती.या मागणीचा विचार करत अकोट आगाराकडून ग्रामिण भागात बस सेवा सुरू झाली आहे.त्यामुळं शेतीविषयक कामांसह अत्यावश्यक कामांसाठी ग्रामीण भागातील प्रवासी वर्ग तालुक्याशी जोडल्या जाणार असल्याचे आगार प्रमुख सुनील भालतीडक यांनी वृत्तकेसरीशी बोलताना सांगितले

,शहरात वाहनांची सुविधा असते. दुर्गम, ग्रामीण भागात मात्र वाहने नसतात. परिणामी नागरिकांची प्रचंड गैरसोय सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाने दुर्गम भागात एसटी बस सुरू कराव्यात, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत असल्याने रा. प.महामंडळाकडून आता परवानगी देण्यात आली आहे.

प्रवाश्यांनी नियम व अटी पाळुनच प्रवास करावाःसुनिल भालतिडक
आकोट आगार प्रमुख

प्रवासाकरीता पूर्वी प्रमाणे अटी व शर्ती लागू असून ६० वर्षावरील व १० वर्षा आतील प्रवाश्यांना प्रवास करता येणार नाही, प्रवाशांना वाहणातून प्रवास करताना तोंडाला मास्क लावणे आवश्यक असणार आहे, एका आसनावर एकच अशी स्वरूपाची आसन व्यवस्था असणार आहे.

अश्या असतील प्रवासी फेऱ्या

१)अकोट आगारातून पहिली बस सकाळी ७:३० वाजता पासून सुरू करण्यात येत असून यामध्येअकोट गांधीग्राम(चोहट्टा मार्गे)पहिली बस रवाना करण्यात येणार आहे, त्यानंतर गांधीग्राम पर्यंत सकाळी ११वाजता, दुपारी १:३० वाजता,४:३० वाजता बसेस सोडण्यात येणार आहे

२) अकोट बेलुरा(लाडेगाव मार्गे) सकाळी ९:३० त्यानंतर दुपारी ३:५० ला

३) अकोट पणज (वाई मार्गे)दुपारी ३:५० वाजता

४) अकोट- हिवरखेड (अडगाव मार्गे) पहिली बस सकाळी ७ वाजता त्यानंतर दुपारी १:१५ मिनिटा नी जाणार आहे,

५)अकोट- तेल्हारा पहिली बस (हिवरखेड मार्गे) दुपारी १२ वाजता सोडण्यात येणार आहे,

६) अकोट – शहापूर (उमरा फाटा मार्गे) सकाळी ९ वाजता, नंतर ५:१५ मिनिटांनी धावणार आहे,

७)अकोट -रोहनखेड (पुंडा मार्गे) सकाळी ११ वाजता त्यानंतर ३:१५ मिनिटांनी धावणार आहे,

८) अकोट- दानापूर (हिवरखेड मार्गे) पहिली बस सकाळी ८ वाजता

९) अकोट-पिंप्री (अडगाव मार्गे) सकाळी १०:३० वाजता व नंतर ५ वाजता

१०) अकोट-आडसुळ (देवरी मार्गे) दुपारी १ वाजता

अशा फेऱ्या नियोजित मार्गावर निर्धारित केल्या असून एका दिवसाला ८४०.४ किलोमीटर चा प्रवास संपूर्ण ग्रामीण भागात बसेस करणार आहे,