पदवीधर निवडणुकिसाठी मतदान केंद्राची तहसीलदार यांच्याकडून पाहणी

0
436

पदवीधर निवडणुकिसाठी मतदान केंद्राची तहसीलदार यांच्याकडून पाहणी

उस्मानाबाद / प्रतिनीधी

आगामी पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उस्मानाबाद तालुक्यातील एकूण 16 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेले आहेत विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्राची तहसीलदार श्री गणेश माळी तसेच नायब तहसीलदार श्री मुस्तफा खोन्दे यांनी आज मंडळ स्तरावरील मतदान केंद्राची पाहणी केली उस्मानाबाद तालुक्यामध्ये एकूण सोळा मतदान केंद्र असून उस्मानाबाद शहरांमध्ये सात मतदान केंद्र आहेत तर उर्वरित नऊ मतदान केंद्र महसुली मंडळ स्तरावर निश्चित करण्यात आलेले आहेत भेट देणे देण्यात आलेल्या मतदान केंद्रांमध्ये येडशी , ढोकी ,तेर ,पाडोळी, केशेगाव ,करजखेडा व अंबेजवळगा , बेंबळी, जागजी या गावाचा समावेश आहे.