जिल्हा मराठी पत्रकार भवनामध्ये देखरेख करणाऱ्या 25 वर्षीय निखिल पाटील ची गळफास घेऊन आत्महत्या

0
2249
Google search engine
Google search engine

अमरावती :- स्थानिक वॉलकट कंपाऊंड येथील  प्रेस क्लब ऑफ अमरावती द्वारा संचलित जिल्हा मराठी पत्रकार भवनामध्ये देखरेख करत असलेल्या 25 वर्षीय निखिल पाटील नामक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना 16 जूनला सायंकाळी 4 ते 5 वाजता दरम्यान उघडीस आली. मिळालेल्या महितीनुसार सूचनेनुसार मृतक निखिल हा तरुण हमालपुरा रहिवासी आहे. तसेच तो गेल्या काही वर्षापासून मराठी पत्रकार भवन येथे देखरेखीचेेेे काम करत होता तसेच पत्रकार असल्यास त्याचे निरोप देण्याचे काम देखील तोच करायचा, मृतक गेल्या सोमवारी रात्रीपासून घरी नव्हता , 16 जून मंगळवारी दुपारी अमरावती मधील वालकट कंपाउंड मराठी पत्रकार भवन परिसरात दुर्गंधी पसरल्याने माहिती परिसरातील स्थानिक नागरिकांनी सिटी कोतवाली पोलिस यांना दिली त्यामुुुुळे तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले.