आर्वीत शहिदांना महाराष्ट्र नाभिक महामंडळच्यावतीने श्रद्धांजली, चिनी उत्पादनांची जाहीर होळी

0
1032

अक्षय खरपे – विदर्भ 24 न्युज वर्धा :-
📱9689542548

आर्वी – भारत-चीन दरम्यान झालेल्या चकमकीमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना आर्वीत संत सेना महाराज देवस्थान येथे राष्ट्रीय नाभिक महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळ आर्वी शाखाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून चिनी उत्पादनांची जाहीर होळी करण्यात आली.यावेळी चिनी सरकारच्या धोरणाचा निषेधही व्यक्त केला आहे.


भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या 20 सैनिकांना तसेच कमांडो संतोष कुमारसह सैनिकांना महाराष्ट्र नाभिक महामंडळ आर्वीच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे आर्वी शहर अध्यक्ष अभिजित काष्टे यांनी भारतीय सैनिकांच्या युद्ध कौशल्यामुळे झिरो पॉईंट ऑक्सिजन असताना अशा दुर्गम जागी चीन सैनिकाला त्यांची जागा दाखवून दिली,अशा सर्व सैनिकांचा देशाला अभिमान असल्याचे नमूद केले.श्रद्धांजलीनंतर चिनी उत्पादित विविध वस्तुंची होळी करून चिनीबाबत आपला रोष व्यक्त केला.यावेळी तालुका अध्यक्ष सचिन चातरकर,शहर अध्यक्ष अभिजीत काष्टे,सलून दुकानदार नाभिक संघटना अध्यक्ष विशाल खैरकर,सुरेश कानेरकर, प्रकाश खरपे,बंडूभाऊ खैरकर, सचिन खरपे,संजय खरपे,नरेंद्र वाटकर, सुरेंद्र वाटकर,वसंतराव खरपे,रघुभाऊ आस्कर,अशोकभाऊ बोरकर,अंकुश बोरकर,मारोतराव वानखडे, प्रभाकर मुडे,मदन खरपे,दिनेश चातरकर ,प्रमोद आगदे,रवी आगदे, मुकिंद आगदे, नरेंद्र तवणे, संदीप खरपे, अमर अनेरकर,गजानन मानकर,श्रीकांत मुडे आर्वीमधील नाभिक बांधव उपस्थित होते.