अन्यथा पडळकरांना चपलीचा चोप देणार ! –

0
902

रा.काँ. युवक प्रदेश सरचिटणीस विनय कडू यांचा संतप्त इशारा

 

*चांदूर रेल्वे – अमरावती*

शरद पवार यांच्यावर अभद्र भाषेत व्यक्त करून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपली लायकी दाखवली आहे. त्या माणसाची नगरसेवक व्हायची लायकी नाही तो माणूस फक्त जातीच्या नावावर राजकारण करून भाजपसारख्या पक्षातून आमदार होतो. त्यामुळे भाजपाला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. जेवढे आमदार पडळकर यांचे वय नाही तेवढा शरद पवार यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. यानंतर असं कुठलं अभद्र वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केले तर विदर्भात पाय ठेवू देणार नाही व त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या स्टाईलने चपलीचा चोप दिला जाईल असा संतप्त इशारा अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनय कडू यांनी दिला.