सेंट्रल बँकेचा भ्रष्टाचार

0
602
Google search engine
Google search engine

शेगांव:- १५० वर्षाच्या सेन्ट्रल बैकेच्या नावाला काळीमा फासण्याचे काम केले खुद कर्मचाऱ्यांनीच शेगाव सेंट्रल बँकेमध्ये एक कोटी ८७ लक्ष २९ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याची तक्रार सेंट्रल बँकेचा रिजनल मॅनेजर ने आज दि २२ जून ला शेगाव पो .स्टे. करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती सेंट्रल बँक शाखा शेगाव येथे मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचा चर्चा शेगाव शहरात होती परंतु आज देण्यात आलेल्या तक्रारी मूळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे । सदर तक्रारी प्रमाणे शेगाव येथील सेंट्रल बँक शाखेमध्ये ८/१०/१३ पासून अपहार करण्यास सुरुवात झालेली होती
असून तो प्रकार वारंवार झालेल्या लेखापरीक्षण मध्ये समोर आलेला आहे.
याबाबत ४४ खातेधारक व १७ कर्जधारकांचा ही तक्रार देण्यात आल्याने त्यामध्ये चौकशी केली असता अनेक प्रकारे धक्कादायक व्यवहार दिसून आले । या संपूर्ण प्रकारची चौकशी केली असता यामध्ये एक कोटी ८७ लक्ष २९ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे सिद्ध झाल्याने व्यवस्थापक संतोष मदनमोहन सावना वय ५६ वर्ष रा. श्रीराम नगर शेगाव , व्यवसाय प्रतिनिधि आनंद भीमराव फूलकर वय ३५ रा. पाळोदी त. शेगाव , व्यवसाय प्रतिनिधि रामेश्वर वासुदेव बोरसे वय ३७ रा . वरखेड़ ता. शेगाव या तीघाना अटक करण्यात आली असून अजुन तीन आरोपी अशे एकूण सहा आरोपी ची नावे तक्रार मधे देण्यात आलेली आहे
सदर अपहार हा वर्ष २०१३ ते २०१९ चा दरम्यान करण्यात आलेला असल्याचे कळते शिवाय २०१३ पासुन शेगाव शाखेवर जेही वरिष्ठ आधीकारी होते त्यांनी या बाबीकडे कसे दुर्लक्ष केले असावे त्यामुळे त्या अधीकाऱ्यांचीही चौकशी व्हावी म्हणजे अजुनही मोठे मगर (मासे ) या घोटाळ्यात समोर येतिल ४०६,४०९,४२०,४६८,४७१,१०९,१२० आईपीसी प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर तपास पोलिस निरीक्षक संतोष ताले व रायटर चौधरी है करीत आहे ।