लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करण्याबाबत – आमदार देवेंद्र भुयार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा !

2893

मोर्शी प्रतिनिधी :
कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले तीन महिने लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व लॉकडाऊनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सद्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असल्याने वितरण कंपनीतर्फे विद्युत ग्राहकांचे मीटर रिडिंग न घेता मानमानी पध्दतीने विद्युत देयके देण्यात आलेली आहे. लॉक डाऊन काळामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्यामुळे मोठ्याप्रमाणात देण्यात आलेली विद्युत बिले कशी भरावित असा प्रश्न विद्युत ग्राहकांना पडलेला आहे.
अशा गंभीर परिस्थितीत महावितरणने सुमारे तीन महिन्यांची वीज बिले पाठविण्यास सुरुवात केली आहे. ही वीज बिले माफ करण्याची मागणी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी २५ जून रोजी मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे. लॉकडाऊनच्या कालखंडात नागरिकांना अनंत आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.
अनेकांच्या घरात रोजगार नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका हातावर पोट असणारे मजूर, शेतमजूर, रिक्षाचालक, छोटे व्यावसायिक व सर्वसामान्य नोकरदार वर्गालाही बसला. या सर्व वर्गाचे गेल्या तीन महिन्यापासून उत्पन्न नसल्याने आर्थिक कुचंबणा सोसत असतानाच तीन महिन्यानंतर आता महावितरणने वीज देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आर्थिक संकटात असतांनाच आलेले वीज बिल भरायचे कसे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शासनाने विशेष बाब म्हणून लॉकडाऊनच्या कालखंडात हे तीन महिन्यांचे वीज देयक माफ करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून वीज बिल माफ करण्याची मागणी केली त्यावेळेस पशु व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, आमदार देवेंद्र भुयार, बाळू कोहळे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस,  राजाभाऊ कुकडे, गुड्डू पठाण, यांची उपस्थिती होती.

जाहिरात