वृक्ष रोपनाचा कार्यक्रम संपन्न

0
371
Google search engine
Google search engine

साईनगर येथील खुल्या जागेच्य विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार:- सौ शकुंतला बुच  यांचे प्रतिपान…!

शेगाव :- शहरातील वृक्षप्रेमी संस्था गो ग्रीन दर्शाया स्थानिक साई नगर मध्ये खुल्या जागेत दिनांक 28 रोजी सकाळी गायत्री परिवार ट्रस्ट वृक्ष मित्र परिवार ,वणी जि यवतमाळ येथील सौ बरखा सुरेश जी बाजोली यांच्या सहयोगाने या मौसमातील पहिल्या वृक्षारोपण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमात नीम वड पिंपळ औदुंबर आवळा सह अनेक वृक्ष संत नगरी च्या प्रथम नागरिक सौ शकुंतला ताई पांडुरंग यांच्या हस्ते लावण्यात आले हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला
या कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष यांनी फक्त साईनगरच नव्हे तर शहरातील सर्वच ओपन स्पेस साठी निधी उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. अशी ग्वाही दिली.
तसेच शेगांव येथील प्रतिष्ढीत नागरीक प्रेमप्रकाश टिबडेवाल यांची कन्या तसेच वणी येथील प्रसिद्ध उद्योगपती सौ बरखा सुरेश जी बाजोरिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा माझा जन्म गावाचा ऋण फेडण्याचा छोटासा प्रयत्न असून यापुढेही ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस असे प्रयत्न करणार आहे.
या कार्यक्रमासाठी पांडुरंग बुच प्रेम प्रकाश टिबडेवाल पटेरिया साहेब मनीष टिबडेवाल ,गायत्री परिवाराचे पोटे गुरुजी मनीष गुरुजी टिबडेवाल ,ज्ञानेश्वर जी साखरे , उद्योगपती दिनेश पालीडीवाल , चार्टर्ड अकाउंटंट आशिष टिबडेवाल सह साई नगरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.