माऊलीच्या चरणी नतमस्तक होत आहे माऊलीचे भक्त

0
484
Google search engine
Google search engine

शेगाव :- आज आषाढी एकादशी आणि आजच्याच दिवशी भगवान विष्णूनी विठ्ठल रूपात येऊन पंढरपूरला आपल्या भक्तांना दर्शन दिले होते तर पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे विदर्भाचे संत नगरी शेगाव श्री गजानन महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली ही नगरी आणि महाराजांचे अतोनात भक्त, कोरोना या आजारामुळे संपूर्ण भारतामध्ये लॉक डॉऊन आहेच परंतु भक्तीची शक्ती किती मोठी असते हे आज संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या शेगावी दिसून येत आहे, सकाळी नेहमीप्रमाणे भाविकांनी श्री गजानन महाराजांच्या दर्शनाकरता ऐणे सुरू केले, महाराजांचे मंदीराचे कपाट बंद असल्यामुळे भाविकांनी बाहेरूनच आपले मस्तक महाराजांच्या चरणी ठेवून आपली भक्ती पूर्ण केली. विठ्ठलाच्या, गजाननाच्या चरणी प्रत्येकाची एकच मागणी असावी हे पांडुरंगा नवीन वर्ष भरभराटीचे सुख-समृद्धीचे आणि चांगल्या आरोग्याचे जावो जगावर आलेली ही महामारी नष्ट व्हावी अशीच आशा बाळगून प्रत्येक भाविक-भक्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना दिसत आहे आणि महाराजांचे विठ्ठल रुपी प्रतिमेचे स्मरण करीत अनेकांनी मंदिरासमोर येऊन दर्शन घेतले.

श्री गजानन भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त मंदिराच्या बाहेर येऊन घेतले विठ्ठलाचे दर्शन.