माझ्या बीड जिल्ह्यासाठी तात्काळ विमा कंपनी नियुक्त करा.

0
683

शेतकऱ्यांच्या विम्यासाठी खासदार डॉ . प्रितम ताई मुंडेचे पंतप्रधानाला साकडे.

प्रतिनिधी :- दिपक गित्ते

बीड दि १. आषाढी एकादशी निमित्ताने, राज्यातील कोरोना संकट लवकर जाऊ दे, अशा प्रकारचं साकड पंढरीच्या पांडुरंगाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातलं. पण आपल्या जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडेंनी मात्र . महत्त्वाच्या प्रश्नावर थेट पंतप्रधानांना साकडे घातले असून. माझ्या बीड जिल्ह्यासाठी तात्काळ विमा कंपनी नियुक्त करा. अशा प्रकारचे पत्र एकादशीच्या मुहूर्तावर पाठवल्याचं कळतं .विशेष म्हणजे विमा योजना ही स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या मागणीनुसारच. तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी लागू केली होती. आणि त्यांची घोषणा बीडच्या जाहीर सभेत झाली होती, हा योगायोग म्हणावा लागेल. याचा अर्थ साहेबांच्या पावलावर लेकीचं पाऊल? असं म्हटलं तर अचूक वाटणार नाही .
संकटात जिल्ह्याच्या खासदारांचं संपूर्ण लक्ष ,आपल्या लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नावर आहे .गेल्या तीन महिन्यात वेगवेगळे प्रश्न त्यांनी अनेक प्रकारे मार्गी लावले. आषाढी एकादशीनिमित्त भाविक भक्तांनी पंढरीच्या पांडुरंगाला, साकडे घातले. मात्र प्रीतमताईनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं ,आणि मागणी केली आहे की, बीड जिल्हा मागासलेला असून, शेतकरी नियमितपणे विमा भारतात. आमच्या जिल्ह्यातील शेतकरी प्रामाणिक आहेत .मात्र आतापर्यंत बीड जिल्ह्यासाठी एकाही विमा कंपनीला नियुक्त न करण्यात आल्याने. भविष्यात शेतकऱ्यांना विमान भरता येणार नाही, मोठया प्रमाणावर त्यांच नुकसान होईल . अशा प्रकारची मागणी या पत्राद्वारे त्यांनी केंद्र सरकारकडे आहे. वास्तविक पाहता अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर खासदारांनी लक्ष घातल आहे. गेल्या वर्षी बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही? मात्र गेल्या पाच वर्षात पंकजाताई पालकमंत्री असताना, करोडो रुपयाचा विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे. यंदा पाऊस मोठ्या प्रमाणावर असला तरी, विमा संरक्षण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. खासदार प्रीतमताईनी एकादशीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी, प्रश्न हातात घेतला .त्याच सर्वत्र कौतुक होत आहे . शेतकरी विमा कंपनी नियुक्त होण्याची वाट पाहत आहेत , काही जिल्ह्यांमध्ये अनेक विमा कंपन्या नियुक्त झालेले आहेत. मात्र बीड जिल्ह्यासाठी अद्यापही निवेदा निघून कंपनी आलेली नाही ? त्याच साठी प्रितम ताई मुंडेनी अगदी वेळेवर या प्रश्नावर लक्ष घातले . शेतकरी वर्गात त्यांच कौतूक होत आहे.