नापिकीला कंटाळून शरद पोहकार यांनी संपविली जीवनयात्रा – आष्टी तालुक्यातील अंतोरा (माणिकनगर) येथे शेतकऱ्याची आत्महत्या !

0
1768

 

आष्टी तालुका प्रतिनिधी :
गेल्या काही वर्षांपासून कमी होणाऱ्या  पावसाळ्यामुळे पाणीटंचाई, नापिकी, दुष्काळ वादळी पाऊस , गारपिट , शेती पिकांवर येणारे रोग , शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव , यामुळे नापिकी,पाणीटंचाई, या सर्व प्रकाराला कंटाळून वाढलेल्या शेतकरी आत्महत्यांनी शेतकऱ्यांच्या रंगाचा बेरंग झाला आहे. नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील खरे रंगच नाहीसे झाले आहे .
आष्टी तालुक्यातील माणिकनगर (अंतोरा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली.

 

अंतोरा ( माणिकनगर) येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी शरद बापुरावजी पोहकार वय ५२ वर्ष यांनी सततच्या नापिकीला कंटाळून गुरुवार दिनांक २जुलै रोजी सकाळी विष प्राशन करून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली .  त्यांच्या कडे कोरडवाहु तीन एकर जमिन असून सतत तीन वर्षापासून दुष्काळ, पाऊस अल्प प्रमाणात पडत असल्याने शेतात काही पिकले नाही.  खाजगी कर्ज कसे फेडायचे कसे घरचा गाडा चालवायचा कसा या चिंतेत ते होते. कुटुंबाचा गाडा कसा हाकलायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.  त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,  म्हातारे आई वडील,  असा परिवार असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवर चालत होता.
स्वर्गीय शरद बापुरावजी पोहकार हे अंतोरा माणिकनगर येथील प्रतिष्ठित व्यक्ती असून माणिकनगर येथील माजी सरपंच म्हणून त्यांनी गावाची धुरा सांभाळी समाजसेवा करून अनेकांच्या समस्या सोडविणारे अंतोरा ( माणिकनगर ) येथील नेतृत्व हरवल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त केल्या जात आहे .