भारतीय सैन्य दलातील कोब्रा कमांडो शुभमचा वाढदिवस रक्तदानाने साजरा

0
815
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

५१ युवा रक्त दात्यांची मानवंदना

नंदीपेठ येथील भारतीय सैन्य दलातील कोब्रा कमांडो शुभम साहेबराव बोरोडे यांचा वाढदिवस नंदिकेश्वेर ग्रुप,क्रांती ग्रुप , नवहिंद ग्रुप यांच्या वतीने रक्तदान व वृक्षारोपनाने साजरा करण्यात आला. नंदिकेश्वर मंदिर नंदीपेठ येथे ३० जुन रोजी हे रक्तदान शिबर पार पडले.मान्यवरांचे हस्ते शुभम साहेबराव बोरोडे यांचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या रक्तदान शिबर मध्ये ५१ रक्त दात्यांची रक्त देऊन भारतीय जवानांचा वाढदिवस साजरा केला.रक्त संकलन करण्या करीता अकोला ब्लड बँक यांचे सौजन्य लाभले. तर एक झाड एक शेतकरी उपक्रमाचे अक्षय जायले याच्या उपस्थीतीत वृक्षारोपन करण्यात आले.

.यावेळी अनिल काळे, सागर बोरोडे, भूषण चिखले, मयूर जुनगरे, विश्वजित दिंडोकार, अनिकेत काळे, विकास पिंपळे , अक्षय काळे , सौरभ बोरोडे, अविनाश काळे, अनुप काळे, तेजस दिंडोकार, अनिरुद्ध काळे, मोहित काळे, रोशन जुनगरे, सुरज शेंडोकार, अजय गवई, अजय काळे, दर्शन बोरोडे, प्रणय टवले, अचल बेलसरे , हर्षल खासबागे, आशिष चिखले, मंगेश तेलगोटे, नरसिंग पाटील,राहुल सपकाळ, हेमंत टवले, अक्षय रोही, अर्पित बोरोडे आदींनी रक्तदान केले.

तसेच कार्यक्रमाला नंदकिशोर शेगोकर( माजी अध्यक्ष जेसीआय), आनंद बाळे( माजी अध्यक्ष जेसीआय) , नीतीन सर शेगोकर( मा. सचिव जेसीआय), अक्षय जयले( एक झाड एक शेतकरी) , सौ.जयश्री संजय बोरोडे(नगरसेविका), मंगेश चिखले(नगरसेवक)मयूर निमकर ,निनाद मानकर ,कुणाल जोत, महादेव सातपुते, संजय देशमुख( अकोला बिडिबिल्डिंग असो. जिल्हाध्यक्ष्य) यांनी भेट दिली .