परळीच्या एसबीआय बॕकेचे पाच कर्मचारी पाॕझिटिव्ह

554

अचानक पाच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान.

प्रतिनिधी:-दिपक गित्ते

दि -०४-परळी एसबीआयच्या पाच कर्मचाऱ्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने काल त्यांचे स्वॕब घेण्यात आले होते.त्याच्या स्वॕब हे कोरोना पाॕझिटिव्ह आढळुन आले आहेत.परळीत ही कोरोनाने शिरकाव केल्याने आता अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे.

परळी शहरातील टॉवर परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या शाखेतील सहा जणांना काल अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्या स्वॕबचे नमुने आरोग्य प्रशासनाने घेतले होते घेऊन अंबाजोगाई येथील Covid-19 सेंटरला पाठवण्यात आले होते ते अहवाल आता नुकताच प्राप्त झाला असून पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आल्याने खळबळ उडाली आहे एसबीआय बँकेची शाखा हीच तालुक्यातील एक मोठी व्यवहार असणारी बँक आहे यामुळे कर्मचाऱ्या पासून अनेक लोकांचा संपर्क आल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे हे कोरोना पॉझिटिव नागरिकांकडून अजून किती लोकांना संसर्ग झाला असेल हे आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान असणार आहे.

उपजिल्हा रुग्णालय परळी वै.
दि.04/07/2020

आज घेतलेले स्वॕब….50

काल पाठवलेले सॕब….14
निगेटिव्ह……09
पाॕझिटिव्ह….05
प्रलंबित……00

आज पर्यत पाठवलेले एकुण स्वॕब 258

निगेटिव्ह ….250
पाॕझिटिव्ह ….08 (कोरोना अक्टीव-5, कोरोना मुक्त-3)
प्रलंबित …… 00

जाहिरात
Previous articleअमरावती ब्रेकिंग :- आणखी १४ कोरोना रुग्ण आढळले – 2 कोरोना रुग्णांच निधन
Next articleअन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र च्या वतीने डॉक्टरांना PPE किट चे वाटप