अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र च्या वतीने डॉक्टरांना PPE किट चे वाटप

0
535

प्रतिनिधी :- दिपक गित्ते

वलांडी (लातूर)दि -०४: सर्व जगभर थैमान घातलेल्या कोरोना रोगाच्या साथीने अवघी मानवजात संक्रमित होत असताना अश्या परिस्थितीतही आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणारे डॉक्टर सुरक्षित राहावेत या सामाजिक बांधीलकीतून वलांडी येथील अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र च्या वतीने डॉक्टरांना पीपीई किट चे वाटप करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रभर अन्यायाला वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यात आणि भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारी बाबूंना वठणीवर आणनारी संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समिती तर्फे डॉक्टर लोकांना ppe किट चे वितरण मान्यवर व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.या वेळी, माजी आमदार श्री धर्माजी सोनकवडे, देवणी पोलीस स्टेशन चे पो.नि. श्री कामटेवाड, वलांडी चौकीचे स.पो.नि. श्री पंकज शिनगारे, वलांडी गटाचे जि. प. सदस्य तथा जि. प. उपाध्यक्ष श्री रामभाऊ तिरुके, उद्योजक श्री आनंद पाटील, श्री रफीकभाई सय्यद, वि.वि.से.सोसायटी चे चेअरमन श्री व्यंकटराव पाटील, वलांडी चे माजी सरपंच श्री रामभाऊ भंडारे, वलांडी चे वैद्यकीय अधिकारी श्री पाटील, डॉ. सर्वदे मॅडम, उपसरपंच श्री दिनेश पाटील,कृ. उ.बाजारसमितीचे सभापती श्री बालाजी बिरादार, मंडळ अधिकारी श्री हेळंबे साहेब, डॉ.बिरादार, डॉ.जावेद सय्यद, डॉ.हमीद अचवलकर, डॉ.भारती, डॉ.गरड, डॉ. बिरादार डॉ.गुंजरगे प्रा.आ. केंद्रातील हसनाळे बटाटे मुशताक कादरी, खलील मुंजेवार,हकीम बौडीवाले, हकीम सौदागर, धनाजी बनसोडे, विलास वाघमारे, अजीज सौदागर, शफीक सौदागर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सय्यद ताजोद्दीन यांनी केले तर आभार समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री महम्मद रफिक सौदागर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाध्यक्ष सगीर मोमीन, अक्रम शेख, शादुल बौडीवाले यांनी परिश्रम घेतले