आकोट परीसरात पावसाचे दमदार आगमन

0
1439
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके

गेल्या दहा- बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे रवीवारी आकोटात परीसरात दमदार आगमन झाले.

सकाळपासून पावसाचे वातावरण होते. मात्र दुपारी थोडा वेळ पडलेल्या सूर्यप्रकाशानंतर लगेच गरम होऊ लागले होते; परंतु सायंकाळी जोरदार पाऊस झाल्यानंतर रात्रभर थोड्या- थोड्या वेळाने पाऊस सुरू होता. शेतकरी या दमदार पावसाने आनंदीत झाले आहेत.तालुक्यात आधीच दुबार पेरणीचे संकट आले असताना शेतकरी राजा या पावसाची आतुरतेने वाट पाहत होता तर दररोज प्रचंड उकाड्याने जनता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होती. एकंदरीतच आज संध्याकाळी बरसलेल्या जलधारांनी अकोट वासियांना दिलासादायक आनंद देत उकाड्यातून सुटका केली.

विजेचा लपंडाव…

संध्याकाळी बरसलेल्या पाऊस धारांनी शहरातील काही भागांमध्ये विजेचा लपंडाव बघावयास मिळाला. तर काही भागांमध्ये विद्युत दाब कमी असल्याने लाइट असूनही काहीच फायदा नव्हता पावसाच्या आगमनाने लोक आनंदून गेले होते. उकाड्याने सुटका केली असली तरी लाईट गेल्यामुळे मच्छरांचा प्रकोप नागरिकांना सहन करावा लागला.