जेनतेच्या रक्षणासाठी प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस थेट फिल्डवर

0
455

 

घरातच राहा !सुरक्षित राहा! आणि कोरोना संसर्गाला हद्द पार करा.

हाच एकमेव संदेश पाळणे नागरिकांचे कर्तव्य आहे
बीड परळी:- नितीन ढाकणे

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या शाखेचे परळी येथे 5 जुलै तब्बल 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तात्काळ बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आदेश काढत परळी शहरास संचार बंदी लागू केली.धारा 144 अंतर्गत नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर फिरू नये तसेच हॉस्पिटल सारख्या अत्यावश्यक असेल तरच बाहेर येण्याचे फर्मान जारी करत 12 जुलै पर्यंत संचार बंदी लागू केले.
खबरदारी ची उपाय योजना म्हणून परळी च्या स्थानिक प्रशासनाचे अधिकारी देखील आता परळीच्या रस्त्यावर उतरून काम करतांना दिसत आहेत
कोरोना व्हायरस चा प्रदूर्भाव वाढू नये या साठी स्थानिक प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न सुरू केले असल्याचे चित्र सध्या शहरात पहावयास मिळत आहे.
सध्या स्थितीला परळीत कोरोंना पॉझिटिव्ह चा आकडा वाढत असून सध्या ही संख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. नागरिकांना प्रशासनाच्या वतीने वारंवार सूचित करण्यात येत आहे की, घरातच राहा !सुरक्षित राहा! आणि कोरोना संसर्गाला हद्द पार करा.