लिंबू झाला ,पेढे झाले , आता आसरा घातल्या आन् आख्या गावाला आलं टेंन्शन !

0
1421
Google search engine
Google search engine

लिंबू झाला ,पेढे झाले , आता आसरा घातल्या आन् आख्या गावाला आलं टेंन्शन !


उस्मानाबाद – (ता.९/७/२०२०) कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच नागरीकांना याचे थोडेही गांभीर्य वाटत नसल्याचे चित्र उस्मानाबाद जिल्ह्यात पहायला मिळत आहे.अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या घटनांना उस्मानाबाद जिल्यात ऊत आला आहे.अशातच उस्मानाबाद तालुक्यातील एका गावात मंगळवारी ता. ७/७/२०२० रोजी त्या गावात आसरा उजवायचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला नातेवाईक आले होते. त्यात एका कोरोना बाधीत रुग्णाची आई हजर होती. त्या मुळे त्यांच्या संपर्कात बर्याच उपस्थीत महिला आल्या होत्या.त्यामुळे सध्या ते गाव फुल्ल टेन्शनमध्ये आहे.सदर महिलेचा स्वँब तपासणीसाठी तेर रुग्णालया मार्फत पाठवला आहे. रिपोर्ट येणे आजून बाकी तोपर्यत आख्या गावाची चिंता वाढली आहे.रिपोर्ट प्राप्त झाल्या नंतरच कळेल.सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामिण भागात अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या घटनेला उधाण आले आहे.सुकुन पहाणे , ढवारे करणे , पारट्या करणे , असे प्रकार सुरु असल्याने ग्रामीण भागातील नागरीकाची चिंता वाढली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात लिंबावर फुंकर मारुन २० जणाला कोरोनाचा प्रसाद एका आराध्याने दिला.नांदेड जिल्ह्यातील काटकळंबात मुलागा झाला म्हणून पेढे वाटले अन् पेढे वाटणारा निघाला कोरोनाबाधीत पेढे खाणार्या ११६ जणाला काँरंटाईन केले आणि आता तर उस्मानाबाद तालुक्यात आसरा उजवल्या अन् त्या कार्यक्रमाला कोरोना बाधीताच्या आईने हजेरी लावली होती म्हणून गावाला टेंन्शन आलं .त्या महिलेचा रिपोर्ट आजुन आला नाही . त्यामुळे गावच टेंन्शन वाढल.

अशा अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या कार्यक्रम करणार्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करणे गरजेचे आहे.