.. फौजदाराला मारहाण करुन पाच जण पळाले तर एक जण सापडला !

0
1101
Google search engine
Google search engine

…. फौजदाराला मारहाण करुन पाच जण पळाले तर एक जण सापडला !


आनाळा / प्रतीनीधी

पोलीसांनी परंडा तालुक्यातील आनाळा येथील एका दुकानासमोरील गर्दी हटवण्यास सांगीतल्याचा राग मनात धरुण पी.एस.आय सह पोलीसावर हल्ला केल्याप्रकरणी आनाळा येथील दुकानदारासह सहा जनाविरोधात आंबी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन यामध्ये एका आरोपीस पोलींसानी अटक केली आहे. या बाबत आंबी पोलीसांनी दिलेली माहीती अशी की, आनाळा येथे मोतीलाल गादीया यांच्या मालकीचे गादीया जनरल स्टोअर्स व मोबाईल शॉपीचे दुकान आहे. सकाळी दहा च्या दरम्यानअiबी ठाण्याचे स.पो.नि. श्री पालवे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी पोलीस गाडीमधुन सोनारी कडे निघाले होते त्याच वेळेस आनाळा येथे आले असता चौकातील मोतीलाल गादीया यांच्या दुकानासमोर अस्ताव्यस्त गाड्याची पार्कींग व गर्दी दिसुन आली त्यानतंर स.पो.नि. श्री पालवे यांनी गाडीतुन उतरूण सदरील दुकानदांर कमलेश गादीया यास कोरोनाच्या अनुशंगाने गर्दी करू नका, सोशल डिस्टंन्स, पाळा रस्त्यावर पार्कींग करु नका अशा सुचना करत असतांना सदरील दुकानदाराने माझ्या गाडया नाहीत, मला काय माहीती नाही असे म्हणत श्री पालवे यांना उलट -सुलट बोलत खाली ढकलुन दिले यानंतर लगेच मोतीलाल गादीया, नितीन गादीय यांच्यासह तीन लोकांनी चिथावणी देत स.पो.नि. श्री पालवे यांच्यासह इतर पोलींसांना शिवीगाळ करत मारहाण करूण जिवे मारण्याची धमकी दिली. व मोतीलाल गादीया यांने पोलीस गाडीवर दगड फेक करत गाडीचे पाठीमागील बाजुस नुकसान केले. या बाबत स.पो.नि. श्री पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुण आंबी पोलीसांत दुकानमालक मोतीलाल देवीचंद गादीया, कमलेश मोतीलाल गादीया, नितीन मोतीलाला गादीया, नितीन बिभिषण शिंदे, मच्छीद्र कदम, लक्ष्मण हनुमंत मुकटे अशा सहा जनाविरोधात कलम 353,323,341,343,109,427,504,506,143नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या सहा आरोपी पैकी कमलेश मोतीलाल गादीया यास पोलीसांनी अटक केली असुन बाकी आरोपींच्या शोधात पोलीस आहेत या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधीकारी श्री खांबे हे करत आहेत..