अकोल्यात भर पावसात सेवा देणाऱ्या त्या ट्राफीक दादाचे गृहमंत्र्यांनी केले कौतुक

0
3181
Google search engine
Google search engine

अकोलाः संतोष विणके

पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांचे हस्ते सत्कार

अकोला येथील शहर वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस हवालदार सुधाकर
डाबेराव ह्यांनी भर पावसात बजावलेल्या कर्त्यव्याची दखल दस्तुरखुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी घेत त्यांचे कौतुक केले. मुसळधार पावसाची तमा न बाळगता आपले कर्त्यव्य पार पडल्याने ट्विटर आणि फेसबुक वर पोस्ट शेअर करत डाबेराव यांचे कौतुक केले. तसेच कार्यकर्त्यानद्वारे पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार पन घडवून आणला.

सुधाकर डाबेराव हे अकोला शहर वाहतूक शाखेत कार्यरत असून सन 2018 मध्ये स्थानिक धिंग्रा चौकात आपले कर्त्याव्य पार पाडत असतांना दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला, तेवढ्यात एक वृद्ध गृहस्थ रस्त्यावरील खड्डा पावसाच्या पाण्यामूळे न दिसल्याने वृद्ध खाली पडला,तेवढ्यात भरधाव ट्रक येत असल्याचे पाहून चौकात कर्त्यव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस सुधाकर डाबेराव हे धावत आले व त्यांनी त्या वृद्धाला सावरले.मात्र यासर्वात चौकात मोठाच ट्राफिक जाम झाल्याने डाबेराव ह्यांनी न डगमगता मुसळधार पावसात भिजून वाहतूक सुरळीत केली,

या घटनेचे फोटो पत्रकाराने सोशल मीडिया वर टाकले ते त्या वेळी खूप व्हायरल झाले. ही पोस्ट दोन तीन दिवसांपासुन परत खुप व्हायरल झाली.ती पोस्ट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोस्ट करून सुधाकर डाबेराव ह्यांचे अभिनंदन केले. या ट्राफीक दादाच्या या कर्तव्य तत्परतेची दखल अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांनी घेऊन सुधाकर डाबेराव ह्यांचे शाल, श्रीफळ, व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. ह्या वेळी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके हे हजर होते, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची पोलिसांप्रतिची संवेदनशीलता परत अधोरेखित झाली आहे.