परळीत कोरोना तपासणीसाठी आलेल्या व्यक्तींचे हाल

0
1313
Google search engine
Google search engine

दुपार झाली तरी आरोग्य कर्मचारी परळी कोवीड -१९ सेंटर वर गैरहजार

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

परळी(बीड):-परळी येथील एस बी आय बँकेतील कर्मच्याऱ्यास कोरोना व्हायरस ची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यापासून बँकेच्या संपर्कात आलेल्या लोकांना परळीतील व परळीच्या आसपास च्या गावातील जनतेला होम कोरोंटाइन करून ठेवण्यात आले आहे मात्र या बँकेच्या संपर्कात आलेल्या लोकात आत्ता दिवसेंदिवस पॉझिटिव्ह चे प्रमाण वाढत चालले असून काल पर्यंत 25 वर ही संख्या जाऊन पोहोचली आहे.
हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी स्थानिक प्रशासनाला आदेशीत केले आहे की तात्काळ परळी येथील एस बी आय बँक कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांचा स्वॅब तपासणी साठी घेण्याची सूचना देण्यात आल्या असून या कामास आज डॉ बाबासाहेब आंबेडेकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात तब्बल 1418 जणांच्या टेस्ट करण्याचे काम सुरू झाले आहे.

आज शेकडो व्यक्तींना तपासणीसाठी सकाळी 9 च्या सुमारास बोलावले आहे आणि या व्यक्तींची रांग डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या गेट पासून जवळ जवळ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या घरापर्यंत आलेली आहे, पण तपासणीसाठी आलेल्या लोकांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आलेत का अशी विचारणा केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी आणखीन तरी एकही आरोग्य कर्मचारी आलेले नाही वेळ लागेल असे सांगण्यात आले . उन्हातान्हात हे सर्व लोग सकाळपासून येऊन रांग लावून बसले असून तरी प्रशासकीय कर्मचारी मात्र शासकीय वेळेनुसार नाहीतर आपल्या सोईनुसार कामकाज करतात की काय असा प्रश्न जनतेला पडत आहे. आता ११:०० वाजून गेले तरी आरोग्य कर्मचारी हजार नाही झाल्यामुळे तपासणीसाठी आलेल्या लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तरी अश्या गैर जिम्मेद्दार कर्मचाऱ्यांना शासन जाब विचारणार की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.