पोलीस पाटलाला जिवे मारण्याची धमकी ; उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव (राजे) येथील घटना !

0
1533

कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस पाटलास शिवीगाळ करून धमकी देणार्यावर गुन्हा दाखल!


उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद जिल्ह्यासह शहर व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रीन झोन मध्ये असणारा जिल्हा आता रेड झोन मध्ये आला आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव राजे येथे विनाकारण दुचाकीवर फिरणे व मास्क लावण्यास सांगण्याचे काम बोरगाव राजे येथील पोलिस पाटिल करत असताना त्यांना गावातीलच व्यक्तीने शिवीगाळ व धमकी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आद्यकर्तव्य असणारा प्रथम नागरिक म्हणजे पोलीस पाटील वयात जबाबदार नागरिक अस जनजागृती व कर्तव्य बजावत असताना बोरगाव राजे येथील ज्योतीराम राजेंद्र सावंत याने शिवीगाळ करीत मनाई आदेश झुगारून धडकल्याने बेंबळी पोलीस ठाण्यात पोलिस पाटलांच्या फिर्यादीवरून संबंधितावर कलम १८९/२६९/२७०/५०४/५०६या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हनुमंत देवकते व तालुका अध्यक्ष ज्योतिराम काटे यांनी अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस पाटलांवर हात घालणाऱ्या नागरिकांना वेळीच लगाम लावण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली असून
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनकर गोरे हे करीत आहेत.