कोरोनामुळे केशवराज महाराज यात्रा महोत्सव रद्द.

0
1024
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके

संत नरसिंग महाराजांनी सुरु केलेली परंपरा..

दरवर्षी केशवराज मंदिर आकोट मध्ये होणारा यात्रा महोत्सव व महाप्रसाद यंदा रद्द करण्यात आला आहे.दि.१३ जुनचा गोपालकाला व महाप्रसाद रद्द झाला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षीचा यात्रा महोत्सव रद्द करण्यात आल्याची माहीती संस्थानद्वारा देण्यात आली आहे.उत्सव रद्द झाला असला तरी श्रींची नित्यनेमाने पुजा व तिर्थस्थापना होऊन परंपरा अखंडीत ठेवली जाणार आहे.

अकोट शहरातील केशवराज संस्थान हे पुरातन संस्थान असून आकोटचे ग्रामदैवत संत नरसिंग महाराज यांनी पाऊस पडुन मेघराज बरसावा म्हणुन केशवराज महाराजांची आराधना करण्यासाठी ही सप्ताह परंपरा सुरू केल्याचे बुजुर्ग मंडळी सांगतात.भाविकांनी घरीच राहून कोरोना रोखण्यासाठी श्रींची आराधना करावी जगातील महामारी दूर व्हावी अशी प्रार्थना करावी असे आवाहन विश्वस्थ मुकुंद देवळे यांनी केले आहे.