आयुष भारतच्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात नियुक्त्या लवकरच होणार : राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी

0
573

आयुष भारतच्या महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात नियुक्त्या लवकरच होणार : राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी


पहिल्या टप्प्यातील आयुष भारतच्या नियुक्त्या पार पडताच दुसऱ्या टप्प्यातील नियुक्त्याची तयारी चालू आहे.

उस्मानाबाद / प्रतिनीधी

सोलापूर : पहिल्या टप्प्यातील आयुष भारतच्या नियुक्त्या पार पडताच दुसऱ्या टप्प्यातील नियुक्त्याची तयारी चालू आहे. आयुष भारत नियुक्त्या जुलै, ऑगस्ट महिन्यात होणार असून त्या अनुषंगाने रविवारी आढावा बैठक आयोजित केली आहे.
आयुष भारत नियुक्त्या विभाग पदाधिकारी आयुष भारत नियुक्त्याच्या संदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना ही राष्ट्रीय अध्यक्षाने दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात किती जिल्ह्यातील नियुक्त्या असणार आहेत, याची विचारणा करण्यात आली आहे. त्यांचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम नियुक्त्या विभाग आयुष भारत ने हाती घेतले आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी रविवारी बैठक होणार आहे. लवकरच महाराष्ट्रातील जिल्ह्यातील नियुक्त्या चा कार्यक्रम घोषित होणार आहे.
पुन्हा महाराष्ट्र मध्ये आयुष भारत एक नवीन वातावरण तयार करणार आहे. डॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी आम्ही खूप मोठा लढा देणार आहे. असे ही आयुष भारत चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी यांनी पत्रकार परिषद मध्ये बोलताना सांगितले.