बोगस बियाणे पुरविणार्‍या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा – कृषी सेवा केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ नये – आमदार देवेंद्र भुयार 

0
1166
Google search engine
Google search engine

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी ! 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :
आधी कोरोना आणि आता निसर्गाची अवकृपा यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आता बोगस बियान्यामुळे सोयाबीन न उगवल्याने शेतकरी हताश झाला आहे.
आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्याचे कृषिचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांना बोगस बियाणे पुरवणार्‍या कंपन्यांवर व बियाणे प्रमाणित करणारे सरकारी अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे .
राज्यात सध्या सोयाबीन, मका आदी बियाण्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींवर कृषी विभागाकडून कोणतीही शहानिशा न करता कृषी केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हे नोंदविण्यात येऊ नये, गुन्हे नोंदविण्याबाबतचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा, तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करन्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .
शासनाने परवानगी दिलेल्या कंपन्यांचे बियाणे सीलबंद स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विकण्याचे काम विक्रेते करतात. बियाणे न उगवण्यामध्ये विक्रेत्यांचा काहीही संबंध येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे योग्य नाही, शेतकर्‍यांचे नुकसान करणार्‍या व काळाबाजार करणार्‍या बियाणे उत्पादक कंपन्यांना व बियाणे प्रमाणित करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना कदापीही माफ करणार नाही. असे मत आमदार देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले .
बि- बियाणे आणि खते विक्रेत्यांविरोधात कृषी विभागाकडून विना चौकशी सर्रासपणे गुन्हे दाखल करून नाहक त्रास देण्यात येत आहे.
कृषी विभागाने प्रमाणीत केलेलेच  बियाणे, खते व कीटकनाशके शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची धडपड असते, शेतकरी कितीही आर्थिक अडचणी असल्या तरी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे काम कृषी सेवा केंद्रा मार्फत भागविल्या जाते, बियाणे कंपनी आणि बियाणे प्रमाणित करणारे सरकारी अधिकारी यांना सोडून शेतकऱ्याच्या प्रत्येक वेळी कामात पडनाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना वेठीस धरले जाते हे योग्य नाही जर गुन्हे दाखल करायचे असेल तर  बियाणे बॅग सर्टीफाईड लेबल सही करनाऱ्यांना आणि बियाणे कंपनी यांचायवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यात सध्या सोयाबीन, कपाशी, मका आदी बियाण्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या आलेल्या तक्रारींवर  कृषी विभागाकडून कोणतीही शहानिशा न करता कृषी केंद्र संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कृषी केंद्र चालक सीलबंद व शासनाची परवानगी असलेलाच माल खरेदी विक्री करीत असतो, मग यात कृषी सेवा केंद्र चालकांचा काही दोष नसल्यामुळे  कृषी सेवा केंद्र चालकांवर विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होऊ नये अशी मागनी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे .