स्वॕब टेस्टींग,आरोग्य तपासणी बाबत उपविभागीय कार्यालयात सभा

0
564

आकोटःता.प्रतिनिधी

अकोट शहरातील कोरोना चा वाढता प्रसार पाहता दि.१४ जुलै.रोजी शहरातील मेडीकल संचालक केमिस्ट ड्रगीस्ट,प्रतिष्ठीत व्यक्ती. नगरसेवक व प्रभागातील नागरीकांची उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सभा घेण्यात आली.

या सभेत शहरातील ६०ते ६५ वर्ष किंवा त्या्पेक्षा जास्त तसेच रक्तदाब, उच्च रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या व्यक्ती तथा गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी व स्वॕब नमुने घेण्याच्या नियोजना बाबत माहिती देण्यात आली.तसेच स्वॅब नमुने घेण्यासाठी ग्रामिण रुग्णा्लय व नागरी आरोग्ये केन्द्र गोलबाजार येथे नियोजित व्य‍वस्था करण्यात येणार असुन जिल्हा्धिकारी कार्यालयातुन रॕपिड अॕन्टीजन टेस्ट किट स्वॕब नमुने घेण्यासाठीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहीती बैठकीत देण्यात आली.

तर मेडीकल संचालकांनी दुकानावर आलेल्या एखाद्या संशयीत व्यक्तीला कोरोना संसर्ग लक्षणांची जसे सर्दी, ताप, खोकला, घसा दुखने, श्वास लागणे यापैकी कोणत्याही आजाराबाबत डॉक्टीरांच्या सल्ला अथवा चिठ्ठी शिवाय औषधे देवू नये.लक्षणे असलेला व्यक्तींची यादी तयार करुन नाव,पत्त्ता,क्र.माहिती कार्यालयात सादर करावी अश्या सुचना देण्यात आल्या. सभेला उपविभागीय अधिकारी गजानन सुरंजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनोवणे, तहसिलदार अशोक गित्ते,शहर पोलीस निरिक्षक संतोष महल्ले व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. असे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले.