पाऊसामुळे नुकसाग्रस्त भागाची पाहणी करताना काँग्रेस पक्षाचे नेते नेते

0
815
Google search engine
Google search engine

*अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेगाव तालुक्यातील जवळा व चिंचोली या गावांना पक्षनेत्या डॉ स्वाती वाकेकर आणि ज्ञानेश्वर दादा पाटील यांची भेट.*
शेगांव:-  दिनांक 15 जुलै च्या मध्यरात्री रोजी शेगाव तालुक्यातील जवळा व चिंचोली परिसरात ढगफुटी झाल्यामुळे लोकांचं अतोनात नुकसान झालं व त्यामुळे आलेल्या पुरात लोकांची घरे वाहून गेली तर साचलेल्या पाण्यामुळे लोकांचे घरातील अन्न-धान्य किराणा यांचे अतोनात नुकसान झाले तसेच शेतीतून महापूर गेल्यामुळे शेती खरडून निघाली व पिकांचे सुद्धा नुकसान झालं, तरी या वेळी लोकांना धिर देण्यासाठी जळगाव (जा.) मतदार संघाच्या पक्षनेत्या *डॉ. सौ.स्वाती वाकेकर तसेच खामगाव मतदारसंघाचे पक्ष नेते ज्ञानेश्वर दादा पाटील* यांनी 16 तारखेला भेट दिली.
तसेच प्रसंगी पुरात वाहून गेल्या मुळे मृत्यु झालेल्या उस्मान खा पठाण यांच्या कुटुंबास सांत्वन परभेट दिली.
तसेच यावेळी पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संवाद साधून त्यांना येथील विदारक आणि गंभीर परिस्थितिची कल्पना देवून तात्काळ शासकीय मदत मिळावी ही विनंती केली . तसेच तहसीलदार बोबडे मॅडम यांच्याशी संवाद करून तत्काळ सर्व्हे करण्यात यावा व सानुग्रह मदत मिळावी याकरिता संवाद साधला.यावेळी ज्या नागरिकांचे घर शेती यांचे नुकसान झाले त्यांनी आपली नोंद व्यवस्थित सर्वे करण्यासाठी आलेल्या पटवारी आणि शासनाच्या इतर कर्मचारी यांच्याकडे देण्याची काळजी घ्यावी असे आवाहन डॉ वाकेकर आणि नाना पाटील यांनी केले
या भेटीदरम्यान त्यांच्यासमवेत श्रीकृष्ण सोनटक्के, नारायण नावकर,गजानन पाटील,सुधाकर मसने,शिवशंकर गीते,गोपाळ ढगे, अवचार गुरुजी श्रीकृष्ण काण्हेरकर,मनवर शहा, बाळकृष्ण काळे, प्रविण भोपळे ,रशीदखा पठाण इत्यादी उपस्थित होते.