जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतली बरे झालेल्‍या रुग्‍णाची भेट – शहरात पाहणी –   आज वडाळी व गजानन नगर येथेही दिली भेट

0
934
Google search engine
Google search engine

 

महानगरपालिका आयुक्‍त प्रशांत रोडे व इतर अधिकारी सोबत होते.

या दोन्‍ही परिसरातील कोव्‍हीड 19 या आजाराने बाधीत झालेले रुग्‍न बरे होवून घरी आले त्‍यांच्‍या तब्‍येतेची विचारपूस आज जिल्‍हाधिकारी व मनपा आयुक्‍तांनी केली. योग्‍य अशी व्‍यवस्‍था प्रशासनाने करुन दिल्‍याबद्दल रुग्‍नांनी यावेळी आभार मानले. या परिसरातील स्‍थानीक नागरिकांशी यावेळी चर्चा केली. प्रत्‍येकाची विचारपूस केली. मास्‍क बांधणे कसे गरजेचे आहे हे त्‍यांना पटवून दिले व तसेच नियमित हात धुवत राहावे असेही यावेळी त्‍यांनी सांगितले. नागरिकांनी मास्‍क बांधले असल्‍यामुळे त्‍यांनी यावेळी सगळयाचे कौतुक केले व इतरानाही मास्‍क बांधण्‍याबाबत प्रोत्‍साहित करावे अश्‍या सुचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या. जिल्‍हाधिकारी महोदयांनी नागरिकांच्‍या शंकाचे यावेळी समाधान केले व रॅपिड अँन्‍टीजेन टेस्‍टची माहिती दिली. विलगीकरण किती महत्‍वाचे आहे हे त्‍यांना समजावून सांगितले. रोगांचे लक्षणे आढळल्‍यास त्‍वरीत आरोग्‍य यंत्रनेशी संपर्क करण्‍याचे आवाहन यावेळी त्‍यांनी केले.
शहरी प्राथमिक आरोग्‍य केंद्र वडाळी या केंद्राची पाहणी त्‍यांनी केली. यावेळी स्‍थानिक नगरसेवक आशिष गांवडे, नगरसेविका सपना ठाकूर, नगरसेविका पंचफुला चव्‍हान व केंद्राचे कर्मचा-यांनी यावेळी संपुर्ण माहिती दिली. सदर केंद्रावरील कर्मचारी पॉझिटीव्‍ह आले होते त्‍यांच्‍याशीही जिल्‍हाधिकारी यांनी भ्रमनध्‍वनी व्‍दारे संपर्क साधून त्‍यांच्‍या तब्‍येतीची विचारपूस केली व त्‍यांना मदत लागल्‍यास संपर्क करावा असेही सांगितले. यावेळी लहान बाळाच्‍या जेवनाची वेगळी व्‍यवस्‍था करण्‍यात यइेल असे त्‍यांनी सांगितले. सद्याच्‍या स्थितीत कमर्चा-यांचे काम वाखण्‍याजोगे असून तुमच्‍या सोबत प्रशासन आहे. त्‍यांनी यावेळी त्‍यांच्‍या कामाचे कौतुक केले व त्‍यांना स्‍वत:ची काळजी घेवून त्‍यांचे कार्य करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. नागरिकांनमध्‍ये जनजागृती करावी की प्रत्‍येकाने मास्‍क हे बांधलेच पाहिजे.
प्रविण नगर परिसरात रुग्‍न पॉझिटीव्‍ह आला होता त्‍या परिसराची पाहणी करुन स्‍थानिक नागरिकांशी यावेळी जिल्‍हाधिकारी महोदयांनी चर्चा केली. त्‍यांना राशन बरोबर मिळते का यांची माहिती जाणून घेतली त्‍यांचा व्‍यवसाय कसा सुरु आह यांची विचारपूस केली. सगळयांनी समाधानकारक उत्‍तरे दिली व प्रशासनाला सहकार्य करु असे यावेळी सांगितले. जिल्‍हाधिकारी यांनी यावेळी त्‍यांना समजावून सांगितले की पाच दिवस आपण मार्केट सुरु केले असून व दोन दिवस बंद केले आहे. आपण प्रशासनाने दिलेल्‍या सुचनांचे तंतोतंत पालन करावे. या ठिकाणी असणा-या मजुर वर्गाशी यावेळी त्‍यांनी चर्चा केली त्‍यांना रोजगार मिळत आहे का यांची माहिती घेतली. त्‍यांनीही यावेळी सांगितले की आता आम्‍हाला काम मिळत आहे. हळूहळू परिस्‍थीती रुळावर येत असल्‍याचे यावेळी त्‍यांनी सांगितले. या परिसरातील आरोग्‍य सेविका सुधा दळवी यांनी सांगितले की सदर परिसरातील नागरिक सहकार्य करत असून त्‍यांची तपासणी सुरु आहे. या परिसरात सर्व्‍हे सुरु असून लक्षणे आढळून येत असलेल्‍या व्‍यक्‍तींची तपासणी करुन त्‍यांना योग्‍य मार्गदर्शन केल्‍या जात आहे.
सरस्‍वती नगर मध्‍ये एकाच कुंटुबातील चार व्‍यक्‍ती पॉझिटीव्‍ह आले होते त्‍यांची भेट जिल्‍हाधिकारी व मनपा आयुक्‍तांनी यावेळी घेतली. स्‍थानिक नगरसेवक धिरज हिवसे, नगरसेविका माधुरी सुहास ठाकरे यांच्‍याशी यावेळी चर्चा करण्‍यात आली. सदर व्‍यक्‍तींनी यावेळी प्रशासनाचे आभार मानले की त्‍यांना सर्व सोयी उपलब्‍ध करुन दिल्‍या. डॉक्‍टरांनी त्‍यांची तपासणी व्‍यवस्थित केली. जेवन चांगले मिळाले, अनेक सोयी उपलब्‍ध करुन दिल्‍या. नागरिकांमध्‍ये जो या बाबतीत गैरसमज आहे तो चुकीचा असल्‍याचे यावेळी त्‍यांनी सांगितले. फक्‍त गरम पाण्‍याचा प्रश्‍न आहे. यावेळी जिल्‍हाधिकारी यांनी सदर व्‍यवस्‍था लवकरच पुरवण्‍यात येईल. सदर व्‍यक्‍तींने आपला अनुभव सांगताना सांगितले की, अनेक रुग्‍ण या सेवेमुळे खुष आहे. नागरिकांनीही घाबरून जावू नये फक्‍त स्‍वतहाची काळजी घ्‍यावी.
यावेळी सहा. आयुक्‍त योगेश पिठे, अमित डेंगरे, आरोग्‍य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. जयश्री नांदुरकर, डॉ. संदिप पाटबागे, डॉ. विद्या खाडे, अभियंता आनंद जोशी, आरोग्‍य सेविका उमा ठाकुर, स्‍वास्‍थ निरीक्षक, आशा वर्कर उपस्थित होत्‍या .