रासप जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांचा पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

0
673
Google search engine
Google search engine

अकोटःसंतोष विणके

पक्षाची ध्येय धोरणे तळागाळात पोहोचविण्याचा निर्णय

राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात आणि माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदास भदे यांच्या मार्गदर्शनात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. सतीश हांडे हे आकोट चे युवा नेतृत्व असून त्यांनी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवत जनसेवा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे ही सर्वसामान्य माणसाला न्याय व हक्क मिळवून देणारी आहेत. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात तसेच माजी आमदार बळीराम सिरस्कार, हरिदासजी भदे यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी पार पडला.

एका छोट्या कार्यक्रमात रासपचे जिल्हाध्यक्ष सतीश हांडे यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनार, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष स्वप्नील उपकारे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष शीलवंत खंडारे, अकोला तालुका अध्यक्ष निवृत्ती मेतकर, अकोट शहर अध्यक्ष सुमित ठाकूर, अकोट तालुका उपाध्यक्ष अमोल नवलकार, राजंदा सर्कल अध्यक्ष कुंदन धुरंधर, अकोट तालुका अध्यक्ष आकाश रावणकर, अकोट तालुका सचिव शिवा पाचपोहे, नितीन सगणे, राम मेतकर आदी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की कोरोनाचे संकट संपल्यानंतर लवकरच एखादा मेळावा आयोजित करून आणखी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सहभागी करून घ्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आवाहनही संग्रामभैय्या गावंडे यांनी केले. माजी आमदार हरिदास भदे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिकाधिक बळकट करायचा आहे. माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी यावेळी बोलताना सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त बळकट करण्याचे आवाहन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यावेळी म्हणाले की पक्षाचे कार्य करतांना किंवा सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करताना कुठेही काही अडचण आल्यास आपल्याशी संपर्क करावा, आणि जोमाने काम करावे.

सतीश हांडे यांनी यावेळी बोलताना सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जोमाने काम करून सर्वसामान्य माणसाला न्याय व हक्क मिळवून देऊ