उप मुख्यमंत्र्यांच्या सासरवाडीत पहिल्यांदाच हे बँनर झळकले !

0
5020

उप मुख्यमंत्र्यांच्या सासरवाडीत पहिल्यांदाच हे बँनर झळकले !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या सासरवाडी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या गावात पहिल्यांदाच पवार कुटूंबासोबत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा फोटो असलेले डिजीटल बँनर पहायला मिळाले.
नुकतीच राष्ट्रवादीचे नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेबांनी सोलापूर दौरा केला दरम्यान सोलापूर येथे आयोजीत बैठाकीत उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर हे उपस्थीत होते.ते व्यासपीठाच्या समोरील बाजूस बासले होते त्यांना खुद्द पवार साहेबांनी व्यासपीठावर बोलावून घेतले . त्यामुळे उस्मानाबादच्या राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळते कि काय अशी चर्चा सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात रंगू लागली आहे.त्यातच आज आणाखीन उप मुख्यमंत्री अजीत पवारांच्या सासरवाडी तिन बड्या नेत्यांचे बँनर बनवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बँनर लावल्यामुळे तेर चे वारे कोणत्या दिशेने वाहू लागले आहे ? हे पाहणे गरजेचे आहे
विशेष म्हणजे एक बँनर तर ग्रामपंचायतच्या नाकावर टिच्चून समोरच प्रथम दर्शनी भागात लावले आहे.त्या बाँनरवर उप मुख्यमंत्री अजीतदादा पवार , मंत्री धनंजय मुंडे ,खासदार ओमराजे निंबाळकर ,आमदार कैलासदादा पाटिल , उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गाडाख , आमदार ज्ञानराज चौगुले ,व आजीत दादांचे मेव्हणे कै.अमरसींह पाटिल यांचे फोटो लावलेले दिसत आहेत.
हे बँनर बरेच काही सांगून जात आहे.