भीषण अपघात :- दोघांचा जागीच मृत्यु तर दोन जखमी , दुचाकी थेट टाटा एस च्या कॅबिनमध्ये काच फोडून घुसली

0
51728
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे –
टाटा एस व दोन दुचाकींच्या झालेल्या भिषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यु तर दोन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी ६.१५ वाजताच्या दरम्यान चांदूर रेल्वे – धामणगाव रोडवर मांडवा गावाच्या वळणावर घडली.
प्राप्तमाहितीनुसार, एमएच ३० एबी ००७६ या क्रमांकाचा टाटा एस मालवाहू गाडी धामणगावरून चांदूर रेल्वेमार्गे दर्यापुर येथे चालला होता. विरूद्ध दिशेने स्प्लेंडर दुचाकी क्र. एमएच २७ बीए ७४९८ ही येत होती. यामध्ये दुचाकी वेगवान असल्याने वळणावर दुचाकी थेट टाटा एस च्या कॅबिनमध्ये काच फोडून घुसली. यामध्ये टाटा एस चालक मोहम्मद आसिफ आजवानी रा. दर्यापुर व दुचाकी चालक राजेंद्र अंबादास बुटलेकर रा. कृष्णा कॉलनी धामणगाव रेल्वे या दोघांचा जागीच मृत्यु झाला. तर त्या दुचाकीच्या मागून दुसरी दुचाकी स्प्लेंडर क्रमांक एमएच २७ एई ७१६० ही येत होती. तर या दुचाकीची सुध्दा टाटा एस ला धडक बसली. यामध्ये दुसऱ्या दुचाकीवरील आशुतोष शिवशंकर बावस्कर ( २१) रा. भिकुजी नगर रामगाव रोड धामणगाव रेल्वे व अंकुश वानखडे (२१) रा. आदर्श कॉलेजच्या मागे, धामणगाव रेल्वे हे दोघे जखमी झाले. जखमी आशुतोष ला चांदूर रेल्वे व अंकुश ला धामणगाव रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात रेफर करण्यात आले. चांदूर रेल्वेवरून आशुतोषला अमरावतीला रेफर करण्यात आले.
मृतकांचे शव चांदूर रेल्वे येथील ग्रामिण रूग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. चांदूर रेल्वे पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच हे. कॉ. शिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेड यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.