ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांची निवड करावी – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन

0
425
Google search engine
Google search engine

ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांची निवड करावी – अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे निवेदन

शेगांव:-  ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांची निवड करावी असे निवेदन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव यांनी आज गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले
निवेदन मध्ये असे नमूद आहे की
अापले मंत्रिमंडळाचे ठरावानुसार मा. राज्यपाल यांनी २०२० चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १० नुसार महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत मध्ये अधिकारी प्रशासक न ठेवता गांवातील नागरीक प्रशासक नियुक्त करावा हे नमुद अाहे.
गांवातील नागरीक प्रशासक नियुक्त करताना स्थानिक पत्रकारांना संधी देण्यात यावी .पत्रकार हा सर्वांना साेबत घेणारा,बुद्धीजीवी लाेकशाहीचा ४ था आधारस्तंभ अाहे.याकरीता त्याच गांवातील स्थानिक पत्रकारावर ग्रा.प.च्या प्रशासक पदाची जबाबदारी साेपविली तर गावविकासाचे दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते .
यामुळे कूपया नियुक्ती होणारे अधिकारी प्रशासक असलेले ग्रामपंचायतवर स्थानिक पत्रकारांना प्रशासकाची संधी द्यावी.याबाबतचे निवेदन महाराष्ट राज्याचे मा.मुख्यमंत्री ना. श्री उद्धवजी ठाकरे ,
मा.ना.श्री.हसनजी मुश्रीफ ग्रामविकास मंत्री यांना पत्रकार संघाचे केंद्रीय कार्यकारिणी मनोहर सुने (राष्ट्रीय अध्यक्ष) सुरेश सवळे (राष्ट्रीय सरचिटणीस) कैलासबापु देशमुख (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष )यांनी पाठविले आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडाेजी महाराज यांचे विचारांना यामधून चालना मिळेल .करीता ग्रा.प. वर पत्रकाराना च प्रशासक नेमावे ही मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव यांनी निवेदन देऊन मागणी केली .या वेळेस
विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष उमेश सिरसाट,तालुका शेगाव अध्यक्ष सचिन कडुकार, शेगाव शहर अध्यक्ष सिद्धार्थ गावंडे,दिनेश घाटोळ, श्रीकांत कलोरे,प्रशांत खत्री, उमेश राजगुरे, संजय त्रिवेदी,संजय ठाकूर,आनंद जवंजाळ,सचिन पाटील, हे उपस्थित होते.