राज राजेश्वर मंदिरा कडे जाणारे सर्व मुख्य रस्ते बंद

0
1186
Google search engine
Google search engine

नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

अकोलाःप्रतीनिधी

अकोला शहराचे आराध्य दैवत असलेले राज राजेश्वर मंदिर ,अकोला शहर व जिल्ह्यात वाढत असलेला करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता बंद असणार आहे. राज्य शासनाचे निर्देशा नुसार 31 जुलै पर्यंत सर्व धार्मिक संस्थाने बंद ठेवण्याचे आदेश असल्याने राज राजेश्वराचे मंदिर सोमवारी दर्शनासाठी बंद राहणार असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे. तसेच राजराजेश्वर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद असणार आहेत. अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी राज राजेश्वर मंदिरा कडे जाणारे सर्व प्रमुख मार्ग रविवार दिनांक 26।7।20 चे रात्री 12।00 वा पासून ते सोमवार दिनांक 27।7।20 चे रात्री 12।00 वा पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकी साठी बंद राहणार असल्याचे आदेश काढले आहेत.

तसेच बंद रस्त्यांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून डाबकी रोड, जुने शहर, श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, अलका बॅटरी चौक, जयहिंद चौक, कोतवाली चौक कडे जाणारा मार्ग श्रीवास्तव चौक, दगडी पूल, मामा बेकरी मार्गे वळविण्यात आला असून कोतवाली चौक , जयहिंद चौका कडे जाणारी वाहतूक मामा बेकरी मार्गे किंवा वाशीम बायपास कडे जाणारी वाहतूक सरकारी बगीचा मार्गे वळविण्यात आली असल्याचे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे कळविले आहे, अकोला शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी ह्याची नोंद घेऊन दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे।