शालेय सत्र फी तगादा न लावण्या बाबत मनवीसेचे निवेदन

0
1134

आकोटः संतोष विणके

खासगी शाळेतील शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये शाळेची फी भरण्यासाठी सक्ती करू नये असे आदेश पालकमंत्री यांनी काढले आहेत .या परीपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी मनविसेने तालुका गटशिक्षण आधिकारींना निवेदन दिले.

सध्या कोविड 19 या महामारीच्या प्रादुर्भाव सुरू आहे आणि सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे विद्यार्थी हे शैक्षणिक वर्षा पासून दूर ठेवू नये यासाठी मनवीसे द्वारा गट शिक्षणाधिकारींना निवेदन देण्यात आले .सदर निवेदन हे मनसे जिल्हाध्यक्ष रविंद्र फाटे , मनविसे विभागीय सरचिटणीस अँड.श्रीरंग दादा तट्टे , मनसे माजी शहराध्यक्ष नरेश हिरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे शहराध्यक्ष शशांक कासवे यांच्या नेतृत्वात शुभम देशपांडे,विवेक अंबळकार,आशिष गवई ,अक्षय रोही ,शाकीर खान तेजस लेंघे व अजय शर्मा आदींनी दिले