वडुरा ते खराळा गावाला जोडणारा रस्ता गेला वाहून,शेतकरी यांच्या शेतीशी तुटला संपर्क नवीन रस्ता बांधकाम ची जिल्हाधिकारी कडे मागणी अमरावती

0
784
Google search engine
Google search engine

वडुरा ते खराळा गावाला जोडणारा रस्ता गेला वाहून,शेतकरी यांच्या शेतीशी तुटला संपर्क
नवीन रस्ता बांधकाम ची जिल्हाधिकारी कडे मागणी

अमरावती

*वडुरा ते खराळा गावजोड कच्चा पाणंद रस्ता 4 ते 5 ठिकाणी पूर्णपणे वाहून गेल्याने व वडुरा बोराळा रस्त्यावरील पुलाच्या पुढील रस्ता वाहून गेल्याने शेतीशी संपर्क तुटला..*
*शेतीचे कामे करण्यास दुसरा रस्ताच नसल्याने संपूर्ण पिके बुडणार*

वडुरा ता.चांदूरबाजार जि.अमरावती येथील वरील रस्त्यावर गावातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांची शेती असून सद्यास चालू असलेल्या पावसामुळे हा रस्ता जागोजागी वाहून गेल्याने माणसाला सुध्दा या रस्त्यावरुन पुढे जाता येत नाही.
जवळपास 500 मीटर रस्ता हा नाल्याला लागून आहे व याच अंतरामध्ये हा रस्त्यावरील माती नाल्यात वाहून गेली आहे.
या रस्त्यांची पक्के स्वरूपात निर्मिती आवश्यक आहे.कितीतरी वर्षांपासून पक्क्या स्वरूपात पाणंद रस्त्याची मागणी गावकरी करीत आहेत. मा.नामदार बच्चूभाऊ कडू यांनी या दोन्ही पांदण रस्त्याच्या कामाकरिता शासनाकडे मागणी सुध्दा केली तरीही शासनाच्या दिरंगाई ने आतापर्यंत हे रस्ते पक्क्या स्वरूपात झालेले नाही.
आज शेतात जाण्यास दुसरा मार्गच शिल्लक नसल्याने पुढील शेतीची कामे करता येणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पिक बुडणार आहे
आपल्या स्तरावर ताबडतोब या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करून द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना पिकाची मशागत करून पीक घरात आणता येईल व पावसाळा संपल्याबरोबर पक्क्या स्वरूपात या दोन्ही रस्त्याचे काम करून द्यावे.
करीता संविनय आपणांस या अती महत्त्वाचे कामाची मागणी सुधीर ठाकरे व शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.