कोंडचा पेशंट उपचारासाठी सिव्हिलला गेला अन् कोरोना झाला !

676
जाहिरात

कोंडचा पेशंट उपचारासाठी सिव्हिलला गेला अन् कोरोना झाला !

हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील एक वयस्कर महिला त्यांना धाप लागत असल्यामुळे कोंड येथुन उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्या महिलेला २४ तारखेला दाखल करण्यात आले होते.चार दिवस उपचार केल्यावर त्यांचा कोरोना रिपोर्ट पाँझीटिव्ह आला आहे.
हा प्रकार गंभीर असल्याची तक्रार त्या महिलेच्या मुलाने आरोग्य मंत्री ,मुख्य मंत्री व उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी यांना वाँटसपवर पाठवली आहे तक्रीरीत त्या महिलेच्या मुलाने त्याच्या आईला चार दिवस उपचार केल्यावर कोरोना झाल्याचा आरोप सदर प्रकार हा अतिशय गंभीर आहे.विशेष म्हणजे त्या महिलेच्या सोबत असणारे त्या महिलेचे पती हे सतत त्या महिलेची देखभाल करण्यासाठी सोबतच रुग्णालयात होते.त्यांना तेथील कर्मचार्यानी त्यांची तपासणी न करताच घरी पाठवले असेही तक्रारीत नमुद केले आहे.
रुग्णाच्या सोबत नसणार्या नातेवाकांना तेर येथे नेऊन त्यांची स्वँब घेतले आणि सोबत राहणार्या पतीला स्वँब न घेताच पाठवले हा प्रशासनाचा गलथान कारभार असल्याची सध्या चर्चा आहे.
उपचारासाठी महिला सिव्हिलला गेली अन् कोरोना झाला अशी तक्रार त्या महिलेच्या मुलाने केली आहे.