16 गौवंश यांची जिवंत सुटका तर 4 आरोपी फरार,
ठाणेदार गोपाल उपाध्यय यांची अवैध गौवंश तस्करी वर धडक मोहीम
चांदुर बाजार :-
अवैध पणे होणाऱ्या गौवंश तस्करी वर तालुक्यातील शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन चे ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी धडक मोहीम राबविली असून त्यांच्या कार्यवाही मुळे गौवंश तस्करी करणारे चोरीच्या पाऊलवाटा चा वापर करून तस्करी करत आहे.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरील आरटीओ चेक वर करोना कोवीड 19 अनुषंगाने दिनांक 29 जुलै ला सकाळी 6 च्या दरम्यान 21 ते 9 नाकाबंदी नाईट पाळी ड्युटीवर असताना आरटीओ बॅरेल चे बाजूला असलेल्या खालच्या रस्त्याने दोन इसम एकूण आठ गोवंश जनावरे जनावरे चार बैल किंमत अंदाजे 40,000 व चार गोरे 32,000असे अंदाजित किंमत 72000 हजार असे जप्त करण्यात आले.तसेच 29 जुलै च्या दुपारी 1 च्या दरम्यान काशी तलाव बहीरम येथून गोवंश जनावरे पायदळ घेऊन येत आहे़ वरून ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी पोस्टापसह नाकाबंदी केली असता दोन अनोळखी इसम गोवंश जनावरे पायदळ काठीने मारहाण करत हाकलत घेऊन येत असताना दिसले. या दोन्ही कार्यवाही मध्ये जनावरे कत्तली करिता पायदळ तोंडाला मुस्क्या बांधून त्यांना मारहाण करून तोंडाला फेस येत असता त्यांना चारा पाणी न करता निर्दयतेने पायदळ वाहतूक करत असताना मिळून आले.तर दुसऱ्या कार्यवाही त्यामध्ये दोन काळ्यारंगाचे बैल दोन पांढरा रंगाचे काळ्या व चार लाल रंगाचे बैल असे जनावरे किंमत अंदाजे 80 हजार रुपये चा माल घटनास्थळावरून पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.
या कार्यवाही मध्ये 5,5(अ),5(ब),9, 9(अ) म.प्राणी संरक्षण कायदा, सहकलंम 11(1)(ह)प्रा. छळ प्रतिबंधक अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या प्रत्येक हरकत वर अवैध गौवंश तस्करी करणारे यांचे माहितीवर हे लक्ष ठेवून असतात त्यामुळे पोलिसांची प्रत्येक माहिती त्यांना असते या दोन्ही कार्यवाही मध्ये पोलिसांच्या नाकाबंदी ची चाहूल लागल्यामुळे दोन कार्यवाही मधील 4 आरोपी हे फरार झाले आहे.त्याच शोध पोलीस घेत आहे.
ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन,अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे,अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गोपाल उपाध्यय,नाईक पोलीस कॉस्टबल गजानन राऊत,हेड कॉस्टबल संजय वंजारी,पो.हे.का संजय ऊईके ,राहुल खर्चन, प्रताप,मुंडे यांनी केली.
चौकट क्रमांक 1…………………….
“बहिरम या ठिकाणी घनदाट जंगल असल्याने याबाबत ची माहिती तिथल्या आणि मध्य प्रदेश मधील लोकांना आहे.तर अवैध गौवंश वाहतूक साठी मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेलगत च्या गावातील लोकांचा वापर होत असल्याची माहिती आहे.तर चेक पोस्ट वर आरटीओ अधिकारी चेकिंग का करत नाही हा प्रश्न आहे.तर रात्रीला 12 नंतर तसेच दिवसाला कोणी नसताना या मध्यप्रदेश मधून महाराष्ट्र मध्ये अवैध पणे कत्तल साठी गौवंश यांची वाहतूक होत आहे.”
चौकट क्रमांक 2…………..
“अतिरिक्त बंदोबस्त हवा….
“ब्राम्हण वाडा थडी आणि शिरजगाव कसबा हे पोलीस स्टेशन मध्य प्रदेश च्या सीमेलगत आहे.मध्यप्रदेश मधून मोठ्या प्रमाणात अवैध गौवंश, अवैध वाळू,अवैध गावठी दारू,अवैध देशी आणि इंग्रजी दारू ही महाराष्ट्र मध्ये येते यावर अंकुश लावण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन स्टॉप कमी पडत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे अतिरिक्त बंदोबस्त जर या दोन्ही पोलीस स्टेशन ला दिला तर अवैध धंदे वर बऱ्यापैकी रोख लागू शकते.”