अडगाव खुर्द येथील लक्ष्मी देवी यात्रा महोत्सव रद्द

141
जाहिरात

अकोटःता.प्रतिनिधी

कोविड १९ कोरोना आजाराचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार यावर्षी आडगाव खुर्द येथील लक्ष्मी देवी यात्रा महोत्सव रद्द करण्यात येत आहे. तर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.अडगाव खुर्द येथे यात्रे निमित्त व दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने दाखल होतात यावर्षी यात्रा दि. 2 ऑगस्ट रविवार व दहीहंडी 3 ऑगस्ट सोमवार ला ठरली होती.

परंतु covid-19 कोरोना या आजारामुळे यावर्षी यात्रा महोत्सव रद्द झाला असाल्याने यात्रा भरणार नाही. तरी सर्व भावी भक्तांना संस्थांनच्या विश्वस्त व गावकरींनी विनंती केली आहे की देवीच्या दर्शनासाठी न येता घरीच देवीची पूजा करून दर्शन घ्यावे व प्रशासनाला सहकार्य करून आपले आरोग्य जपत कोविडच्या संकटाला हरवण्यास प्रशासनास मदत करावी असे आवाहन लक्ष्मी माता विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी अडगाव खुर्द यांनी भाविकांना केले आहे.