*पॉझिटिव्ह अहवाल तब्बल 11 दिवसांनी दाखविला निगेटिव्ह,* *2023 मधील कोरोना अहवाल 2020 मध्ये कसा?* *चौकशी करून कार्यवाहीसाठी नातेवाईक यांची

जाहिरात

*पॉझिटिव्ह अहवाल तब्बल 11 दिवसांनी दाखविला निगेटिव्ह,*

*2023 मधील कोरोना अहवाल 2020 मध्ये कसा?*

*चौकशी करून कार्यवाहीसाठी नातेवाईक यांची जिल्हाधिकारी यांच्या कडे धाव*

*चांदुर बाजार :- ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

कोरोना जसा जसा वाढत आहे तसा तसा त्याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा किंवा रेकॉर्डिंग आणि एसएमएस व्हायरल होत आहे.मात्र या बाबत सत्यात काय यावर प्रशासन यांनी माहिती दिली नाही.त्यामुळे अनेक संभ्रम तयार होत आहे. अश्याच निगेटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह दाखविल्या मुळें 4 दिवस पर्यत संपूर्ण कुटुंब याना क्वारंटईन करण्यात आले. या संपूर्ण प्रकारची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी दिगंबर जयपूरे यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्या कडे केलेल्या तक्रार मध्ये केली आहे.

तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील रहिवासी जनाबाई मारोतराव जयपुरे यांचा दिनांक 10 जुलै ला स्वब घेण्यात आला होता त्याचा अहवाल हा दिनांक 13 जुलै 2020 ला अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याचे सांगून जयपुरे यांच्या कुटुंबातील 15 जणांना चांदुर बाजार येथे क्वारांटाइन करण्यात आले होते मात्र दिनांक 21 जुलै 2020 ला दिगंबर जयपुरे यांनी स्वतः अहवाल प्राप्त केला तर अहवाल हा निगेटिव्ह असल्याचे समोर आले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ब्राम्हणवाडा यांच्या प्राप्त झालेल्या अहवाल मध्ये 2023 चा अहवाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आला.मात्र प्रत्यक्षात अहवाल हा निगेटिव्ह होता.मात्र प्रशासन च्या बेजबाबदार पण मुळे आम्हाला कुटुंब सहित क्वारंराईन करण्यात आले.याचा आम्हाला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.या प्रकरण ची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही ची मागणी दिगंबर जयपुरे यांनी जिल्हाधिकारी केलेल्या तक्रार मध्ये म्हटले आहे.

चौकट क्रमांक:- दुसरा स्वब कधी घेतला.?

जयपुरे यांच्या तक्रार नुसार दिनांक 10 जुलै ला जनाबाई जयपुरे यांचा स्वब घेण्यात आला,12 जुलै ला त्यांचा मृत्य झाला आणि 13 जुलै ला अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा संदेश आला मात्र 21 ला अहवाल हा निगेटिव्ह दाखविण्यात आला.तर एक चूक मुळे कुटूंब याना मानसिक त्रास सहन करावा लागला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तर दुसरा स्वब कधी घेतला अशा प्रश्न जयपुरे यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया:-

कोरोना अहवाल निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह दाखवला त्यामुळे सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा पसरविला गेल्या.तसेच आमच्यावर जणू गावातील लोकांनी बहिष्कार टाकला सारखे केले.किराणा दुकान मधून कोणीही किराणा नेत नाही आहे.या प्रकरणी चौकशी केली गेली पाहिजे आणि दोषींवर कार्यवाही झाली पाहिजे.

1)दिगंबर जयपुरे तक्रार कर्ते

2)जिल्हा प्रशासन कडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर आम्ही पुढील कार्यवाही केली.त्यामुळे याबाबत माहिती घेतली जाईल.
ज्योस्तना भगत तालुका आरोग्य अधिकारी