अवैध देशी दारू विकणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात 5 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,

जाहिरात

अवैध देशी दारू विकणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात
5 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त,

चांदुर बाजार :-

अवैध पणे दारू विक्री करणारे यांच्या सह शिरजगाव कसबा पोलिसांनी एकूण 5 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये सिने स्टाईल ने सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्यय यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहिती च्या आधारे आज दिनांक 1 ऑगस्ट ला सकाळी 7 च्या दरम्यान शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील करजगाव रामनगर फाटा ते कल्होडी रोड चांदूर बाजार या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असता मो.सा क्रमांक MH 27 CD 0644 चा चालक हा देशी दारू वाहतुकी संबंधाने समोर पायलटींग करीत असताना व चार चाकी वाहन क्रमांक MH 27 BE 2206 चा चालक हा आपल्या वाहनात देशी दारू पेट्या व सदर कामाकरिता दोन इसमांना बसवून वाहतूक करीत असताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून पाच देशी दारूच्या 05 पॅकबंद पेट्या किंमत अंदाजे 15,000 रुपये व चार चाकी वाहन क्रमांक एम एच 27BE 2206 कार किं.अं.रू. 5,00,000/- व ऍक्टिवा मोटर सायकल क्रमांक एम एच 27 CD ,0644 किंमत अंदाजे रू 40,000/- व नगदी रू 16,000/- व जुने वापरते मोबाईल किं.अं.रू 2000/- असा एकूण रू 5,73,000/- चा मिळून आला. तसेच सध्या संपूर्ण राज्यात व देशात कोरोना संसर्ग संबंधाने मा. जिल्हाधिकारी सा. अमरावती यांचे संचार बंदीचे आदेश आदेशाचे उल्लंघन केल्याने ) अतुल रामकृष्ण हिरडे वय 39 वर्ष.2) राहुल रामकृष्ण हिरडे वय 34 वर्ष 3)संतोष किसनराव गुलुगुलु माने वय 22 वर्ष 4) श्रीकृष्ण इंगळे व 41 वर्ष सर्व राहणार वार्ड नंबर 6 शिराळा यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कार्यवाही सहायक पोलिस निरीक्षक गोपाल उपाध्यय हेड कॉस्टबल संजय तायडे,आणि त्यांच्या टीम ने केली.

बॉक्समध्ये ……….
“अतुल हरडे हा अनेक दिवसांपासून अवैध पणे दारूची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना होती.शेवटी आज त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून हा तालुक्यातील अनेक ठिकाणी अश्याप्रकारे अवैध दारू वाहतूक करत असतो.”

फोटो:- आरोपी सोबत शिरजगाव कसबा पोलीस टीम