लाँकडाऊनमध्ये ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार येथील ६५ प्रसूती सुलभ प्रसूतीवर भर:- कामगिरी गरजूं सह अनेकांना दिलासा देणारी चांदुर बाजार :-शशिकांत निचत

0
1288
Google search engine
Google search engine

लाँकडाऊनमध्ये ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार येथील ६५ प्रसूती

सुलभ प्रसूतीवर भर:- कामगिरी गरजूं सह अनेकांना दिलासा देणारी

चांदुर बाजार :-शशिकांत निचत

मार्च महिन्यात कोरोना आजाराची दहशत प्रचंड होती त्यामुळे रस्तेही निर्मनुष्य होती. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांच्या बाळंतपणाचा प्रश्न अनेकां पुढे होता. मात्र ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजार येथे रुग्णालयाने या संकटाच्या काळात तब्बल ६५ प्रसुती करून उत्कृष्ट कार्य केले. या ग्रामीण रुग्णालयात प्रसुती करणाऱे नागरिक गरीब आणि मध्यम कुटुंबातील आहे. या सर्वांना आरोग्य विभागाच्या या कामगिरीमुळे संकट काळात दिलासा मिळाला आहे.

प्राप्त माहितीनुसार एप्रिल ते 20 जुलै च्या या तारखेपर्यंत ग्रामीण रुग्णालय चांदूर बाजारात सुलभ प्रसूती ला भर देत एकूण ६५ प्रसूती झाल्या आहेत ह्या सर्व प्रसूती नॉर्मल झाल्या आहेत. याचे कारण तालुक्यात सिजर ची व्यवस्था नसल्यामुळे क्रिटिकल असणाऱ्या गर्भवती महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे रेफर करण्यात आले. मागील साडेचार महिन्यांच्या तुलनात्मक विचार केल्यास जून महिन्यात सर्वाधिक २२ प्रसूती झाले आहे. तर मे महिन्यात सर्वात कमी७ प्रसूती झालेल्या आहे . एप्रिल महिना १७प्रसूती, मे महिन्यात ७, प्रसूती, जून महिन्यात २२ प्रसूती, जुलै महिन्यात २० तारखेपर्यंत १९प्रसूती झालेल्या आहे एकूण ६५प्रसुती झाल्या आहेत प्रसुती विभागात येणाऱ्या प्रत्येक गर्भवती महिलेला तेथील वैद्यकीय अधिकारी अगदी सोप्या शब्दात स्वतःची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी याचा सल्ला देत असल्याने नागरिकांचाही या रुग्णालयात वरील विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे .

(प्रतिक्रिया);—
रुग्णालयावर नागरिकांचा असलेल्या विश्वास हा आम्हाला उत्कृष्ट काम करण्यासाठी प्रेरणा देतो कोरोना संकटातही रुग्णालयावर विश्वास ठेवून अनेक गर्भवती महिला येथे प्रसूतीसाठी दाखल झाल्यास मागील साडेचार महिन्याच्या काळात एकूण ६५ प्रसूती झाल्या आहेत
1)प्राजक्ता देशमुख प्रसुती विभाग ग्रामीण रुग्णालय चांदूरबाजार