परळी शहरात सोमवार पासुन कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात येणार

0
832

परळी वै….

नितीन ढाकणे , दिपक गित्ते 

सौम्य लक्षणे असलेल्या पाॕझिटिव्ह रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहेत

परळी तालुक्यात कोरोना पाॕझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व अंबाजोगाई,केज येथे आपुरी पडत असलेली सोय पाहता जिल्हा आरोग्य प्रशासनाने आज परळीकरांच्या सोयीचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.परळी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृह येथे सोमवार पासुन कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार,मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पवार यांच्या नियोजनाखाली आता परळीत सोमवार पासुन कोवीड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे.कोवीड केअर सेंटरला लागणारे 28 आरोग्य कर्मचारी स्टाफ पैकी आज तात्काळ दोन वैद्यकीय अधिकारी,तीन स्टाफ नर्स, एक प्रयोग तंत्रज्ञ, एक औषधी निर्माता,एक डाटा एंट्री ऑपरेटर, पाच कक्ष सेवक असे 13 पद भरली आहेत.तर इतर 15 पदे लवकरात उपलब्ध होणार आहेत.
कोवीड केअर सेंटरचे प्रमुख म्हणुन डॉ अर्शद शेख व त्यांच्या समवेत 6 वैद्यकीय अधिकारी असणार आहेत 6 पैकी 2 वैद्यकीय अधिकारी रुजु करण्यात आले आहेत तर इतर 4 वैद्यकीय अधिकारी लवकरच उपलब्ध होणार आहेत.
परळीच्या सुरु होत असलेल्या कोवीड केअर सेंटरला लक्षणे नसलेले,अति सौम्य लक्षणे असलेल्या पाॕझिटिव्ह रुग्णांवर येथे उपचार करण्यात येणार आहेत असे डॉ कुरमे,डॉ.मोरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक तहसीलदार विपीन पाटील,गटविकास अधिकारी संजय केंद्रे परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे,वैद्यकीय अधिक्षक डॉ दिनेश कुरमे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांच्या विशेष देखरेखेखाली हे कोवीड केअर सेंटर असणार आहे.