Amravati Shocking News :- अमरावती शिवसेनेचे नेते सोमेश्वरभाऊ पुसतकर यांचे दुःखद निधन

3328
जाहिरात

सोमेश्वर पुसतकर यांचे अकस्मात निधन

अमरावती/प्रतिनिधी- शिवसेनेचा पाया अमरावतीत भक्कम रोवणारे शिलेदार म्हणून परिचित व आजाद हिंद मंडळ, बुधवारा चे प्रमुख पदाधिकारी सोमेश़्वर पुसतकर यांचे रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास डॉ.कडू यांच्या रुग्णालयात निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते। डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली। त्यांना व्हेंटिलेटरवर श्वास देण्याचा प्रयत्न झाला. पण, अवघ्या काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची माहिती मिळताच जिल्हयातील राजकीय व सामाजिक वर्तुळात शोकलहर पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.