अपडाऊन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोण लावणार रोख? शासनाच्या आदेशाला तालुक्यात सरकारी कार्यलाय मध्ये अंमलबजावणी नाही?

0
816
Google search engine
Google search engine

अपडाऊन करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कोण लावणार रोख?
शासनाच्या आदेशाला तालुक्यात सरकारी कार्यलाय मध्ये अंमलबजावणी नाही?

चांदुर बाजार –

कोरोनाच्या काळात चांदुर बाजार तालुक्यातील अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. तसा आदेशही राज्य सरकार अमरावती जिल्हाधिकारी ,अमरावती जिल्हा परिषद मुख्यअधिकारी यांनी जारी केला होता.मात्र तालुक्यातील तहसील कार्यलाय,ग्रामपंचायत ,तलाठी कार्यलाय, आरोग्य सेवक,महावितरण अधिकारी, वायरमन हे मुख्यलयीन राहत नाही आहे.

ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक,महावितरण अभियंता,वायरमन, यांनी राज्य सरकार ,जिल्हाधिकारी ,मुख्याधिकारी जिल्हा परिषद आदेश धाब्यावर बसवला. अद्यापही ते मुख्यालय वास्तव्याला नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

कोरोना संसर्गाची वाढती पार्श्वभूमी बघता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्थानिक पातळीवर अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयी रहावे जेणेकरून नागरिकांना योग्य ती माहिती उपलब्ध होऊ शकेल. कोरोणाच्या काळात लॉकडाउन असल्यामुळे त्यांचा तालुक्याच्या स्तरावर चक्कर होऊ नये, तहसील, पंचायत समिती कार्यालयात गर्दी होऊ नये या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची काळजी जिल्हाधिकारी यांनी घेतली होती. मुख्यालयी राहून शेतकऱ्यांना नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र या आदेशाला त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी खो दिलाय. तहसील कार्यालय मधील कर्मचारी, अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक,महावितरण अधिकारी ,वायरमन अद्यापही मुख्यालयी राहत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

घरभाडे घेणारे यांची चौकशी व्हावी……………………
“ज्या ठिकाणी नेमणूक आहे तिथं काम करण्यासाठी मुख्यलयीन राहण्याचा आदेश आहे.मात्र नावाला घर भाडे दाखवून त्याची उचल केली जाते.तर प्रत्यक्षात अधिकारी किंवा कर्मचारी हे दुसऱ्या ठिकाणी वरून अपडाऊन करतात. त्यामुळे भाड्याने राहत असल्याचे सांगून घरभाडे घेणारे याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तालुक्यातील नागरिक याच्या कडून होत आहे.

प्रतिक्रिया:-

“मा.जिल्हाधिकारी यांच्या पत्रावरून संबंधित विभागला पत्र दिले आहे.तरी देखील अधिकारी आणि कर्मचारी मुख्यलयीन राहत नसेल तर पुन्हा त्यांना एक मुख्यलयीन राहण्याबाबत पत्र देण्यात येणार आहे.”

1)देवेंद्र सवाई तहसीलदार (प्रभारी) चांदुर बाजार