रात्रीच्या अंधारात नदीची होतय खरडपट्टी,अवैध वाळू तस्करी वर प्रशासन चा अंकुश नाही दोन वर्षे पासून वाळू घाटाचा लिलाव नाही?

0
678
Google search engine
Google search engine

रात्रीच्या अंधारात नदीची होतय खरडपट्टी,अवैध वाळू तस्करी वर प्रशासन चा अंकुश नाही
दोन वर्षे पासून वाळू घाटाचा लिलाव नाही?

चांदुर बाजार:-

वाळू म्हटले की तिथं तस्करी आलीच आणि कमी लागत मध्ये अधिक जास्त प्रमाणात उत्पन्न मिळणायचे एक व्यवसाय म्हणून यांच्या कडे अवैध पणे वाळू तस्करी करणारे पाहत आहे.तर तालुक्यातील 6 महसूल मंडळ मधून होणाऱ्या अवैध वाळू तस्करी बाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे होणाऱ्या तस्करी वरून दिसत आहे.

कुरळपुरणा,ब्राम्हणवाडा थडी थुगाव,करजगाव,घाटलाडकी,आसेगावं, कोदोरी, देउरवाड़ा, शिरजगाव कसबा,तामसवाडी या ठिकाणी वरून मोठया प्रमाणात अवैध पणे वाळू तस्करी सुरू आहे.तर यावर कार्यवाही साठी गेलेल्या महसूल अधिकारी यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.त्यामुळे अनेक चर्चा सुरू आहे तर शासकीय तसेच निमशासकीय कार्यलाय बांधकाम ठिकाणी अवैध वाळू चा वापर आहे.तर तालुक्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू चे साठे लागले आहे.यावर कार्यवाही करण्यासाठी महसुल विभाग कधी पुढाकार घेणार हा प्रश्न आहे.तर वाळू घाट मधील अनेक ठिकाणी वाळूचे ढीग लागले आहे.त्यावर कार्यवाही साठी महसूल विभाग पाय बाहेर टाकत नाही आहे.त्यामुळे अनेक वेळा कार्यवाही गेलेल्या महसूल पथक रिकाम्या हाती परत येत आहे त्यामुळे अनेक चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील वाळू घाटाचा लिलाव 30 सप्टेंबर 2018 पासून झाला नाही.त्यामुळे अवैध वाळू तस्कर यांची चांगली दिवाळी सुरू आहे.तर याला स्थानिक महसूल विभाग मधील अनेक कर्मचारी हे याला संगनमत तर नाही? त्यामुळे महसूल मध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी घट या साठी महसूल विभाग शांत का अशा प्रश्न आहे.

चौकट:- ——————1
तालुक्यातील होणाऱ्या अवैध वाळू तस्करी वर ग्रामीण अधीक्षक यांच्या पथक च्या तालुक्यातील एक महिन्यात 5 कार्यवाही आहे.तर शिरजगाव कसबा पोलीस यांनी देखील कार्यवाही केल्या. तसेच यांच्या तुलनेत महसूल विभाग यांनी 5 वाहनावर कार्यवाही केली असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.त्यामुळे स्थानिक महसूल विभाग ची कार्यपद्धती न समजण्यासारखी आहे.

चौकट क्रमांक 2———————–

अवैध वाळू तस्करी रोखण्यासाठी अनेक वेळा पथक तयार करण्यात आले.पण पथक रिकाम्या हाताने परत येत असल्याने फक्त पेट्रोल खर्च आणि सांगायला पथक तयार करण्यात आले का अशी चर्चा आहे?

चौकट क्रमांक 3————-
वाळू घाट असलेला भागातुन महसूल विभाग यांच्या शेवटचा महत्वपूर्ण कणा कोतवाल महिला याच्या ठिकाणी त्याचे नातेवाईक काम करीत आहे.त्यामुळे अवैध वाळू तस्करी याना रोख बसण्याऐवजी चालना मिळते आहे.हा सर्व प्रकार महसूल विभाग मधील अधिकारी आणि कर्मचारी याना माहिती असून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

प्रतिक्रिया:-

अवैध पणे होणाऱ्या वाळू तस्करी रोखण्यासाठी पथक तयार करणायत आले आहे.ज्या ठिकाणी कोतवाल यांचे नातेवाईक काम करत आहे त्याची माहिती घेऊन उचित कार्यव्याही करू.तसेच वाळू घाट लिलाव चे प्रस्ताव वरिष्ठ याना पाठविले आहे.

अभिजित जगताप तहसीलदार चांदुर बाजार.