बेलुरा येथे ब्लू टायगर सम्राट ग्रुप व वंचित बहुजन आघाडीचे वृक्षारोपन

0
1186
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी

आकोट तालुक्यातील ग्राम बेलुरा येथे वंचित बहुजन आघाडी व ब्लू टायगर सम्राट ग्रुपच्या वतीने वृक्षारोपन मोहीम राबवण्यात आली.याअंतर्गत गावातील स्मशानभुमित अशोक,पिंपळ,कडुनिंब यासह ईतर दिर्घायुष्यी वृक्षांचे रोपन करण्यात आले.

या वृक्षारोपन उपक्रमात गौतम पंचांग आनंद धुळे मेजर, राहुल रायबोले, दिगंबर पंचांग, दयाराम वानखडे, बाळकृष्ण पंचांग, अजय पंचांग, पंजाबराव पळसपगार, ज्ञानेश्वर धुंदे, नागेश इंगळे मयूर वगरे संदेश धुंदे व ईतर गावकरींनी सहभाग घेतला होता.या वृक्षारोपन उपक्रमाने गावातील लहान थोरांमध्ये उत्साह संचारला होता.तर गावातील तरुण युवकांनी हे वृक्ष जगवण्याची जबाबदारी घेत पर्यावरण विषयक जाणीवेचा परीचय दिला.