*24 तासाच्या आत तिवसा येथील हत्येचा आरोपी आणि साथीदार याना अटक* *विशेष पथक ,तिवसा, कुऱ्हा,चांदुर बाजार,ब्राम्हणवाडा थडी पोलीस यांची संयुक्त कार्यवाही*

0
6357

 

*अमरावती :-*

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील आंबेडकर चौकात रविवारी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास चाकूने वार करून अजय बाबाराव दलाल या युवकाला गंभीर जखमी करून काही जणांनी पळ काढला.दलाल याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.तिवसा पोलिसांनी पंचनामा करून हत्येच्या गुन्ह्याची नोंद करून टीम तयार केली आणि आरोपीचा शोध सुरू केला.

गुप्त माहिती च्या आधारे तिवसा येथील पोलीस टीम ने चांदुर बाजार गाठले आणि 24 तासाच्या आत हत्येच्या चार आरोपीला यांना चांदुर बाजार तालुक्यातील माधान फाट्यावर नाकाबंदी करत तिवसा पोलीस स्टेशन ची निरीक्षक रिता उईके,कुऱ्हा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन जाधव चांदुर बाजार चे ठाणेदार दिलीप वळवी,ब्राम्हणवाडा थडी येथील सहायक पोलिस निरीक्षक अमूल बछव, चांदुर बाजार चे पोलीस खुफिया प्रशांत भटकर,विरेंद्र अमृतकर,तिवसा येथील कर्मचारी अरविंद गावडे , मोहसीन शाह, बबलू चव्हाण,आणि त्यांच्या टीमने रात्री 3 ते 4 च्या दरम्यान  आरोपी 1)अतुल रुपरावजी सिंघन ,राहणार बेलोरा,2) नितीन बाळूजी काळे,3) प्रतीक बलभीम गोंडाने दोन्ही राहणार अमरावती अटक करण्यात आली.तर त्याना आज न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तर दिनांक 10 ऑगस्ट ला दुपारी अमरावती येथून सुरेंद्र काळे या चौथा आरोपिला अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांचे विशेष पथक प्रमुख अजय आकरे सहायक पोलीस निरीक्षक, स्वप्नीर तवर, अजमद सैयद आणि पंकज फाटे यांनी अटक केली.

ही कार्यवाही अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन,अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे,चांदुर रेल्वे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश सिंगते ,अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी पोपट अबदगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तिवसा पोलीस चे ठाणेदार रिता उईके,कुऱ्हा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सचिन जाधव ,चांदुर बाजार चे ठाणेदार दिलीप वळवी,ब्राम्हणवाडा थडी येथील सहायक पोलिस निरीक्षक अमूल बच्चव आणि चांदुर बाजार,तिवसा,ब्राम्हणवाडा थडी येथील पोलीस टीम ने केली.

*”अतुल सिंगण यांच्या चांदुर बाजार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा हत्येच्या गुन्ह्याची नोंद आहे. मागील एका गुन्हा विशेष पथक मधील कर्मचारी पंकज फाटे व अरविंद गावंडे हे चांदुर बाजार असताना त्यांच्या टीम ने त्याला अटक केली होती.तिवसा येथील हत्येच्या प्रकरण मध्ये त्याचे नाव आल्याने अरविंद गावंडे आणि पंकज फाटे यांच्या नेटवर्क यांची या प्रकरणी चांगली मदत पोलिसांना मिळाली.”*